भारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ

| Updated on: Dec 15, 2020 | 1:03 AM

आर्थिकदृष्ट्या प्रबळ मुस्लीम राष्ट्रांशी भारताचे वाढते संबंध पाकिस्तानला त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाटत आहे.

भारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ
Follow us on

दुबई : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे मागील एक आठवड्यापासून संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि सौदी अरबच्या दौऱ्यावर अनेक भेटीगाठी घेतल्या. 14 डिसेंबरला त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. यानंतर पाकिस्तानमध्ये मात्र, चांगलीच खळबळ माजलेली दिसत आहे. या दोन्ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ मुस्लीम राष्ट्रांशी भारताचे वाढते संबंध पाकिस्तानला त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाटत आहे (Pakistan is not happy on Saudi Arab and UAE tour of Indian Army Chief MM Naravane).

भारतीय सैन्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जनरल नरवणे आणि सौदी अरबचे सैन्यदल प्रमुख जनरल फयाद बिन हामिद यांच्या भेटीचा फोटो शेअर करत दौऱ्याची माहिती दिली. जनरल नरवणे पहिले भारतीय लष्करप्रमुख आहेत ज्यांनी सौदी अरब आणि यूएईचा दौरा केला. आतापर्यंत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना सौदी अरबला जाणं सामान्य मानलं जात होतं. मात्र, भारताकडूनही हे भेटसत्र झाल्याने पाकिस्तानच्या हितसंबंधांना आव्हान मिळालं आहे.

जनरल नरवणे यांच्या यूएई आणि सौदी अरब दौऱ्याच्या फोटोंची पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. आता सौदी अरब देखील पाकिस्तानसोबत नसल्याचं पाकिस्तानच्या माध्यमांमधून बोललं जात आहे. भारत आणि सौदी अरबमधील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ तयार करत आहेत. पाकिस्तानमधील नागरिक याला पंतप्रधान इम्रान खान यांच्या पराराष्ट्र नीतीचं अपयश मानत आहेत. त्यामुळेच सौदी अरब आणि यूएई भारताच्या जवळ जात असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. खरंतर हे दोन्ही देश पाकिस्तानचे जुने मित्र देश राहिले आहेत. मात्र, सध्या दोन्ही देशांची भारतासोबत जवळीक वाढत आहे.

इम्रान खान सरकार अपयशी?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना पाकिस्तानच्या माध्यमांनी प्रश्न विचारला होता की “एकीकडे यूएई पाकिस्तानच्या नागरिकांना वर्क व्हिजा देणं बंद करत आहे. दुसरीकडे भारताचे लष्करप्रमुख सौदी आणि यूएईचा दौरा करत आहेत. पाकिस्तानची परराष्ट्र नीती कुठं चाललीय?”

यावर अब्बासी म्हणाले, “आपण इतर देशांची परराष्ट्र नीती ठरवू शकत नाही, पण आपल्याला आपल्या देशाच्या परराष्ट्र नीतीविषयी विचार करायला हवा. जे देश पाकिस्तानसोबत कठिण परिस्थितीतही उभे राहिले त्यांच्यासोबत आपले संबंध सुधारले की बिघडले हे पाहिलं पाहिजे. भारत सौदी अरबसोबत संबंध ठेवो अथवा न ठेवो तो त्यांचा प्रश्न आहे. आपण ते ठरवू शकत नाही. मात्र, आपल्याला पाकिस्तानच्या संबंधांबाबत विचार करायला हवा. खरं हेच आहे की पाकिस्तानचे सौदी अरबसोबत चांगले संबंध नाहीत. सध्या तणावाची स्थिती आहे. हे संबंध सुधारायला हवेत.”

हेही वाचा :

लष्करप्रमुखांचा युएई दौरा, लँड फोर्सेस इन्स्टिट्यूटला भेट

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

भारताचे लष्कर प्रमुख जनरल नरवणे 4 दिवसीय सौदी अरब आणि UAE दौऱ्यावर जाणार

Pakistan is not happy on Saudi Arab and UAE tour of Indian Army Chief MM Naravane