Hydropower plant in Balakot, Pakistan इस्लामाबाद : आधीच मोडकळीस आलेल्या आर्थिक स्थितीत महागाई आणि कोरोनाने पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. सध्या पाकिस्तान आकंठ कर्जात बुडाला आहे, मात्र त्यातही पाकिस्तानकडून कर्ज घेण्याचं काम सुरुच आहे. आता पाकिस्तान बालाकोटमध्ये उधारीवर पैसे घेऊन एक महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा करणार आहे. बालाकोटमध्ये 300 मेगावॅट क्षमतेचा हायड्रोपावर प्लँट उभा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. यासाठी आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानला 300 मिलियन डॉलर (जवळपास 2195 कोटी रुपये) कर्ज मंजूर केलंय. ADB ने मंगळवारी (30 मार्च) याबाबत घोषणा केलीय (Pakistan taking loan for a big hydropower plant in Balakot).
भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बालाकोट हे नाव जगभरात चर्चेत आलं. भारताने या ठिकाणी कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. 2019 मध्ये भारतातील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ही कारवाई केली होती. आशियाई विकास बँकेने म्हटलंय, “‘द एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) 300 मेगावॅट क्षमतेच्या हायड्रोपावर प्लँटच्या निर्मितीसाठी 300 मिलियन डॉलरचं कर्ज मंजूर केलं होतं. या अंतर्गत प्रदुषण विरहित उर्जानिर्मितीसाठी पाकिस्तानला मदत मिळेल.”
अधिक वीज निर्मिती करण्यासाठी पाकिस्तानला मदत होणार
मनीला येथील एशियाई विकास बँकेने (ADB) म्हटलंय, “पाकिस्तान सरकार या प्रकल्पात 175 मिलियन डॉलर गुंतवणूक करेल. याशिवाय पाकिस्तानने एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेकडूनही (AIIB) या प्रकल्पासाठी 280 मिलियन डॉलरचं कर्ज घेतलंय. या प्रकल्पामुळे क्लीन एनर्जीचे 1,143 गीगावॅट-तास वाढतील. यामुळे उर्जा निर्मिती क्षेत्रातही स्थिरता विश्वास वाढेल.
हा उर्जा प्रकल्प बालाकोटमध्ये नेमका कुठे उभा राहणार?
हा उर्जा निर्मिती प्रकल्प खैबर पख्तूनख्वाहजवळून वाहणाऱ्या कुन्हर नदीवर उभा राहणार आहे. 2027 पर्यंत हा उर्जा प्रकल्प तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. हा प्रकल्प भूकंपरोधी असणार आहे. तसेच यावर हवामान आणि वातावरणाचाही परिणाम होणार नाही. या प्रकल्पामुळे स्थानिय लोकांसाठी 1200 पेक्षा अधिक नोकऱ्या तयार होतील, असंही बँकेने म्हटलं आहे.
हेही वाचा :
Report on Nuclear Bomb : पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अणुबॉम्ब, कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र?
Pune Corona update| आशियात महाराष्ट्र, तर पाकिस्तानपेक्षा पुण्यात रुग्णवाढ जास्त
व्हिडीओ पाहा :
Pakistan taking loan for a big hydropower plant in Balakot