लवकरच पाकिस्तान श्रीमंत देश होणार, असा खजाना सापडला की संपूर्ण देशाची गरीबी हटणार

| Updated on: Sep 09, 2024 | 6:06 PM

भगवान देता है तो छप्पर फाडके देता है अशी सध्या पाकिस्तानची अवस्था आहे. सतत अस्थिरतेचा शाप आणि लष्कर आणि राजकीय नेत्यांच्या संघर्षामुळे इस्लामिक महासत्ता होण्याच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानला खरोखरच आता महासत्ता करणारा खजाना सापडला आहे.

लवकरच पाकिस्तान श्रीमंत देश होणार, असा खजाना सापडला की संपूर्ण देशाची गरीबी हटणार
Follow us on

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला आपला शेजारी पाकिस्तान लवकरच श्रीमंत देश होणार आहे. मीडियात आलेल्या बातमीनूसार पाकिस्तानच्या समुद्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसचे मोठा नैसर्गिक साठा सापडला आहे. हे भंडार इतके मोठे आहे की या देशाचे संपूर्ण दारिद्र्य संपुष्ठात येणार आहे. डॉन न्यूज टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले असून एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आधारे दिलेल्या वृत्तात या तेलाच्या साठ्याचा शोध एका मित्र देशाच्या मदतीने तीन वर्षांपासून सुरु होता.

पाकिस्तानच्या तेल साठ्याचा शोध करण्यासाठी भौगोलिक सर्वेक्षणाची मदत घेण्यात आली. संबंधित विभागांनी पाकिस्तानच्या समुद्रात मोठा तेल साठा असल्याचे म्हटले आहे. या तेल साठ्याचा शोध लागल्याने यास ब्ल्यू वॉटर इकॉनॉमी म्हटले जात आहे. या ब्ल्यू वॉटर इकॉनॉमीचा लाभ पदरात पाडण्यासाठी निविदा तसेच संशोधन प्रस्तावाचा अभ्यास केला जात आहे. म्हणजे पुढील भविष्यात याचा तपास सुरु होऊ शकतो. त्यासाठी तेल विहीरी नेमक्या कुठे खोदायच्या त्याचे ठिकाण निश्चत करणे आणि या तेल विहीरींना खणणे आणि त्यातून तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

जगातला चौथा मोठा साठा

या ब्ल्यू वॉटर इकॉनॉमीत केवळ तेल आणि गॅसच नाही तर अनेक मूल्यवान खनिज संपत्ती आणि मुलद्रव्यांना देखील समुद्राच्या तळातून शोधून काढले जाऊ शकते. या तेल साठ्यांमुळे देशाची आर्थिक परिस्थिती आमुलाग्र बदल होऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते हा जगातील सर्वात मोठा चौथा तेल साठा असल्याचा अंदाज वर्तवविला जात आहे.