पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतात ड्रग्ज(Drugs) सप्लाय होत असल्याचा धक्कादायक प्रकार उगडकीस आला आहे. पाकिस्तानी तस्कराने(Pakistani Smugglers) ड्रोनद्वारे हेरॉईनची दोन पाकिटे भारताच्या हद्दीत फेकली. ड्रोनद्वारे होणाऱ्या या ड्रग तस्करीमुळे सुरक्षा जवानांची डोकोदुखी वाढली आहे. सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सीमे लगतच्या परिसरातील सर्व हालचालींवर अदिक बारकाईने लक्ष दिले जात आहे. ड्रोन द्वारे फक्त ड्रग्जच नाही तर श्सत्रांचा पुरवठा देखील केला जात अलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर रविवारी रात्री उशिरा श्रीकरणपूर सेक्टरमध्ये सुरक्षा यंत्रणांना संशयास्पद हालचाली दिसल्या. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईनची दोन पाकिटे भारताच्या हद्दीत टाकण्यात आली. सुरक्षा दलाचे जवान संशयितांवरही नजर ठेवून आहेत. दोन पाकिटे जवानांनी हस्तगत केली असून आणखी पाकिटे टाकली आहेत का? याचाही जवान शोध घेत आहेत.
यापूर्वी 1 जून रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यात पाच भारतीय तस्करांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड आणि सुमारे 6.5 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. हे साडेसहा किलो हेरॉईनही सीमेपलीकडून पाकिस्तानातून ड्रोनद्वारे टाकण्यात आले होते.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ड्रोनद्वारे पाकिस्तानातून भारतीय हद्दीत हेरॉईनची तस्करी झाल्याची घटना समोर आली होती. त्यात 5 स्थानिक तस्करांना अटक करण्यात आली. यापूर्वी पाकिस्तान पंजाबमध्ये ड्रोनद्वारे हेरॉइनची तस्करी करत होता. मात्र त्यानंतर तेथे कडक अंमलबजावणी केल्याने आता पाकिस्तानी तस्करांची नजर राजस्थानच्या सीमेवर आहे. आता ते ड्रोनच्या माध्यमातून येथे हेरॉइनची तस्करी करत आहेत.
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा भागात राहणाऱ्या काही स्थानिक तस्करांचीही पाकिस्तानी तस्करांशी गाठ पडली आहे. पाकिस्तानी तस्कर तेथून हेरॉईन पाठवतात आणि ते इथून ते मिळवतात आणि पंजाबला पोहोचवतात. हे बर्याच दिवसांपासून सुरू आहे. बीएसएफचे जवान संपूर्ण सतर्कतेने सीमेवर लक्ष ठेवत असले, तरी पाकिस्तानी तस्कर त्यांच्या कारवाया मागे घेत नाहीत.