पहिल्यांदाच मिळाला पाक सौदर्यवतीला मिस युनिव्हर्सचा बहुमान, पण का भडकले पाकिस्तानी पंतप्रधान ?

| Updated on: Sep 16, 2023 | 1:03 PM

कधी नव्हे ते प्रथमच इस्लामिक राजवट असलेल्या पाकिस्तानची एखादी महिला मिस युनिव्हर्स झाली आहे. परंतू या स्पर्धेच्या विरोधात पाकिस्तानी सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमके काय आहे प्रकरण पाहा

पहिल्यांदाच मिळाला पाक सौदर्यवतीला मिस युनिव्हर्सचा बहुमान, पण का भडकले पाकिस्तानी पंतप्रधान ?
Miss Universe Pakistan 2023 is Erica Robin for Miss Universe 2023
Image Credit source: socialmedia
Follow us on

स्लामाबाद | 16 सप्टेंबर 2023 : युनायटेड अरब अमिरातीत झालेल्या भव्य स्पर्धेत प्रथमच मुस्लीम देश पाकिस्तानची एरिका रॉबिन मिस युनिव्हर्स म्हणून निवडून आली आहे. परंतू युएईत पाकिस्तानच्या नावाने ब्युटी कॉन्टेस्ट करणाऱ्या कंपनीवर पाकिस्तान सरकार संतापले आहे. पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवार-उल-हक काकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाला युएई सरकारशी संपर्क करायला सांगितले आहे. या स्पर्धेत मिस युनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी उमेदवारांची निवड झाली होती. परंतू आता पाकिस्तान सरकारने या कार्यक्रमाच्या हेतूंवर शंका उपस्थित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत.

युएईत पाकिस्तानाच्या नावाचा वापर करुन सौदर्य स्पर्धा भरविणाऱ्या कंपनीवर सरकार भडकले आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारची परवानगी घेतलेली नाही असे सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवार-उल-हक काकर यांनी गुप्तचर विभागाला या संघटनेची पाळेमुळे शोधण्याचे आदेश दिले आहेत. ही कंपनी जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या नावाचा गैरवापर तर करीत नाही ना ? याचा संशय पाकिस्तानला आला आहे.

पाकिस्तानला गुप्तचर विभागाने या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर केला आहे. त्यात दुबईतील बिझनेस ग्रुप युजेन पब्लिशिंग एण्ड मार्केटींगने 2023 च्या या स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार मिळविला आहे. त्यांनी houseofyugen.com नावाचा प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर 24 ते 28 दरम्यानच्या पाकिस्तानी महिलांना अर्ज करायला सांगितले. यात म्हटले आहे की वैवाहिक स्थितीचा उल्लेख करुन रजिस्ट्रेशन करु शकता असे म्हटले आहे.

14 सप्टेंबरला एरिका विजेता बनली

ही प्रक्रिया 4 मार्च 2023 रोजी सुरु झाली. विशेष म्हणजे दुबईच्या या ग्रुपकडे बहरीन आणि इजिप्त या देशाच्या मिस युनिव्हर्स फ्रेंचाईजीचे अधिकार आहेत. पाकिस्तानातून 200 उमेदवारांनी मतदान होऊन अंतिम निवड झाली. 14 सप्टेंबर 2023 एक सोहळ्यात पाच उमेदवारांतून एरिका रॉबिन हिला विजेती घोषीत केले. युजेन ग्रुप या सोहळ्याचा प्राथमिक प्रायोजक आहे. जोश युजेन नावाचा व्यक्ती मिस युनिव्हर्स पाकिस्तान या संस्थेचा राष्ट्रीय संचालक आहे. युजेन ग्रुपने व्होटींग एप चॉईसली सोबत एक करार केला होता. त्याद्वारे आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करायचे होते.

अशी मिळते फ्रेंचायझी

संघटनेने म्हटले आहे की स्पर्धक आपआपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटनूसार बिझनेस फर्म नॅशनल डायरेक्टर असतात. ते फ्रेंचायजीसाठी देशांना संपर्क करतात. कोणताही कॉर्पोरेट ग्रुप 1000 डॉलर फि भरुन फ्रेंचायझी घेऊ शकतो. परंतू संबंधित सरकारची परवानगी हवी. उमेदवार त्या देशांचे नागरिक असायला हवेत.