Pilot falls unconscious : आकाशातच पायलट बेशुद्ध; प्रवाशाने हाताळले स्टीयरिंग, विमान कसे उडवायचे हे माहित नव्हते, एटीसीच्या सूचनेनुसार 70 मैल दूर केले सुरक्षित लँडिंग

| Updated on: May 12, 2022 | 6:26 PM

ही घटना मंगळवारी घडली. फ्लोरिडामधील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेला 14 आसनी सेसना कारवाँ विमान सुमारे 70 मैलांवर असताना पायलट अचानक आजारी पडला आणि तो बेशुद्ध झाला. त्यावेळी ही माहिती एका प्रवाशाने हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली.

Pilot falls unconscious : आकाशातच पायलट बेशुद्ध; प्रवाशाने हाताळले स्टीयरिंग, विमान कसे उडवायचे हे माहित नव्हते, एटीसीच्या सूचनेनुसार 70 मैल दूर केले सुरक्षित लँडिंग
विमान
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : अनेक सर्व सामान्यांचे एक स्वप्न असते की त्यांचा एक तरी विमान प्रवास (Air travel) व्हावा. पण त्याच प्रवासात जर विमानाचा पायलट उड्डाण करताना अचानक बेशुद्ध (unconscious) झाला किंवा त्याचा अचानक मृत्यू झाला तर? अशा वेळी तुमची काय हालत होईल? फक्त विचार करूनच नको तो विमानप्रवास असेच अनेक जन म्हणतील. पण एखादा धाडसी असेल तर तो प्रवास करेलच त्याचबरोबर तो त्याक्षणी विमानही उडवेल. हो अशाच प्रकारे एका प्रवाशांने समय सुचकता दाखवत विमान सुरक्षितपणे उतरवावे. हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये तुम्ही हे दृश्य अनेकदा पाहिलं असेल, पण अमेरिकेत असं खरोखरच घडलं आहे. फ्लोरिडातील आकाशात मध्यभागी उडणाऱ्या विमानाच्या पायलटची प्रकृती अचानक बिघडली. आणि तो अचानक बेशुद्ध झाला. यावेळी विमानात एकच गोंधळ उडाला. त्यावेळी तेथे प्रवासात असणाऱ्या कोणालाच विमान चालवता येत नव्हते. अशा वेळी एका प्रवाशाने त्याला विमान कसे उडवायचे हे देखील माहित नसताना, ते 70 मैलांपर्यंत उडवले. एवढेच नाही तर एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या (air traffic controller) सूचनेनुसार या प्रवाशाने विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले. या प्रवाशाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

प्रवाशाने 14 आसनी युटिलिटी विमान उडवले

ही घटना मंगळवारी घडली. फ्लोरिडामधील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेला 14 आसनी सेसना कारवाँ विमान सुमारे 70 मैलांवर असताना पायलट अचानक आजारी पडला आणि तो बेशुद्ध झाला. त्यावेळी ही माहिती एका प्रवाशाने हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली. यासंदर्भातील प्रवासी आणि ATC यांच्यातील वायरलेस ऑडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रवासी रेडिओवर म्हणत आहे, ‘येथे माझ्यासह इतर प्रवाशी संकंटात आहोत. आमचा पायलट बेशुद्ध झाला आहे. यानंतर एटीसीने त्यांना विमान उडवण्याबाबत विचारले असता, त्याने सांगितले की, विमान उडवले सोडा तर कधी कॉकपिटमध्येही प्रवेश केलेला नाही. मात्र माझ्यासमोर फ्लोरिडाचा किनारा दिसत आहे, असे त्याने सांगितले.

एटीसीने तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती केली

असे असूनही, एटीसीने त्याला विमानाचे स्टीअरिंग हाताळण्यास सांगितले. तसेच फ्लाइट इन्स्ट्रक्टरने प्रवाशांना पंखांची पातळी संतुलित ठेवण्यास सांगितले. तसेच त्याला समुद्र किनाऱ्यावरून पुढे जाण्यास सांगितले. जेणे करून एटीसीला त्याला शोधू शकत नाही. दरम्यान त्याला पाम बीच विमानतळापूर्वी सुमारे 25 मैल अंतरावर शोधण्यात यश आले. यानंतर त्यांना उतरण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

हे ऐकून दुसऱ्या विमानातील वैमानिकांना धक्काच बसला

दरम्यान एटीसीने इतर विमानांच्या वैमानिकांना त्यांची विमाने ही आकाशातच ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी एका पायलटने याचे कारण विचारले. त्यावर एटीसी म्हणाला, तुम्ही आत्ताच काही प्रवाशांना विमानातून उतरताना पाहिले आहे का. त्याचा पायलट बेशुद्ध झाला होता. तर ते विमान एका प्रवाशाने उतरवले आहे. हे ऐकून पायलटच्या तोंडून बाहेर पडले, अरे देवा, उत्तम काम…

अशा प्रकारची ही पहिलीच घटना

अमेरिकन एव्हिएशन तज्ज्ञ जॉन नॅन्स यांनी डब्ल्यूपीबीएफ-टीव्हीशी बोलताना या प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘माझ्या माहितीनुसार मी पहिल्यांदाच ऐकले आहे की, ज्याला विमान उड्डाणाचा अनुभव नाही अशा व्यक्तीने विमान उतरवले.