वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी परिवहन मंत्रालयासाठी माजी मेयर पीट बटइग (Pete Buttigieg) यांचे नाव सुचवले आहे. समलिंगी असल्याचं सार्वजनिकरित्या स्वीकारत राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा करणारे बटइग हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच नेते ठरले आहेत. त्यांचे नामांकन डेमोक्रॅटिक पक्षाने मान्य केल्यास ते सिनेटचे पहिले एलजीबीटीक्यू (LGBTQ) कॅबिनेट सदस्य असतील. (Pete Buttigieg will be the first lgbtq secretary of us president cabinet)
साऊथ बँडच्या विकासाचा शिल्पकार
38 वर्षीय पीट बटइग हे स्टेट प्रायमरी किंवा कॉकसची निवडणूक जिंकणाऱ्या सर्वात युवा नेत्यांपैकी एक होते. 29 व्या वर्षी ते पहिल्यांदा निवडणुकीत विजयी झाले होते. इंडियानातील होमटाऊन साऊथ बँडमधील विकासकार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणत साऊथ बँडला इनोव्हेशन आणि नोकऱ्यांचं हब बनवलं. साऊथ बँड हा कोणे एके काळी अमेरिकेतील सर्वात निर्मनुष्य भाग मानला जात असे.
बायडनकडून पीट यांचं गुणगान
“पीट बटइग हे देशभक्त आणि समजूतदार व्यक्ती आहेत. परिवहन मंत्रालय आव्हानं आणि संधीने पुरेपूर व्यापलेलं आहे. त्यामुळे पीट यांना मी परिवहन मंत्रिपदी नियुक्त करतो” अशी घोषणा बायडन यांनी मंगळवारी केली. त्यानंतर युवावर्गासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे, पर्यावरणसंबंधी आव्हानं पेलणे आणि सर्वांना समान वागणूक देण्याची ग्वाही पीट यांनी जनतेला दिली.
Mayor @PeteButtigieg is a leader, patriot, and problem-solver. He speaks to the best of who we are as a nation. (Pete Buttigieg will be the first lgbtq secretary of us president cabinet)
I am nominating him for Secretary of Transportation because he’s equipped to take on the challenges at the intersection of jobs, infrastructure, equity, and climate.
— Joe Biden (@JoeBiden) December 16, 2020
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडन यांच्या अध्यक्षपदावर इलेक्ट्रोलच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल हिलसमोर होणार आहे.
अमेरिकेत अध्यक्षांच्या शपथविधीचा सोहळा 20 जानेवारीला संपन्न होतो. या दिवसाला अध्यक्षांच्या कार्यकालाचा पहिला दिवस मानला जाते. अमेरिकेत ही परंपरा 1937 पासून सुरु आहे. यावर्षाीच्या शपथविधी सोहळ्यावर कोरोना संसर्गामुळे मर्यादा येणार आहेत.
संबंधित बातम्या:
अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?
(Pete Buttigieg will be the first lgbtq secretary of us president cabinet)