नवी दिल्ली : महागाईच्या (Inflation) आगीत होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शनिवार केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. त्यांनी पुन्हा एकदा इंधनावर आकारण्यात येणारी एक्साईज ड्युटी (Excise duty) करमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी भारतात पेट्रोल प्रति लिटर मागे 9.5 रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. घरगुती एलपीजी गॅस देखील स्वस्त झाला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी भारत सरकारचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी केले, त्यामुळे त्यांना पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा देता आल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. आमचे सरकार देखील याच सर्व गोष्टींवर काम करत होते. मात्र विरोधकांनी परकीय शक्तींच्या मदतीने सरकार घालावले. आता जे सत्तेत आले आहेत त्यांच्यामुळे अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाण्याची शक्यता असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचे कैतुक केले आहे. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केले. त्यामुळेच आज भारतात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊ शकले. हा भारत सरकारचा चांगला निर्णय होता. मात्र आमच्याकडे असे होऊ शकले नाही. सरकार उलथवण्यासाठी परकीय शक्तींची मदत घेण्यात आली. मात्र त्यामुळे आमची अर्थव्यवस्था आणखी खाली आल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. भारताने जे केले तेच आम्ही करणार होतो. मात्र आमचे सरकार टिकू शकले नाही, असे देखील इमरान खान यांनी म्हटले आहे.
After fuel prices cut, Imran Khan praises India for buying discounted Russian oil despite US pressure
Read @ANI Story | https://t.co/X8UtFUaTQC#ImranKhan #FuelPrice pic.twitter.com/1Aw3DDn86p
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2022
गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनची प्रचंड प्रमान हानी झाली आहे. रशियाने युक्रेनमध्ये युद्धबंदीची घोषणा करावी अशी मागणी नाटोचे सदस्य असलेल्या अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी केली होती. मात्र रशियाने युद्ध सुरूच ठेवल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध घालण्यात आले. अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली. रशिया हा कच्च्या तेलाची निर्यात करणारा जगातील एक प्रमुख देश आहे. रशियामधून अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात केली जात होती. मात्र अमेरिकेने आयातीवर बंदी घातल्याने रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले होते. भारताने देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानत सवलतीच्या दरातील कच्च्या तेलाची खरेदी केली. परिणामी देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्वस्त झाल्या आहेत.