तब्बल 11 दिवसाच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास आणि इस्रायलमध्ये शांततेची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझापट्टीतील सैन्य अभियानाला रोखण्याच्या एकतर्फी संघर्ष विरामाला मंजुरी दिली आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर हा आपला विजय असल्याचं सांगत हमासमध्ये प्रचंड जल्लोष केला जात आहे (Israel-Hamas Ceasefire)
संघर्ष विराम जाहीर झाल्यानंतर गाझा शहरात एकच जल्लोष करण्यात आला (Celebration in Gaza). हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडले. तसेच हमासचा झेंडा फडकवून येथील नागरिकांनी आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. यात लहान मुलांचाही समावेश होता. हा हमासचा विजय आहे. आम्ही इस्रायलवर विजय मिळविला आहे, असं हमासच्या एका नेत्याने सांगितलं.
या युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत इस्रायल आणि हमासच्या या रक्तरंजित संघर्षात गाझातील 240 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे (Israel Gaza Death Toll). त्यात 65 लहान मुलांचाही समावेश आहे. तर 1900 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गाझापट्टीला सर्वाधिक आर्थिक नुकसान झालं आहे. इस्रायलने हमासवर सुमारे 4 हजार 300 रॉकेटचा मारा केला होता.
दुसरीकडे हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 2 मुले, एक सैनिक आणि एका भारतीय महिलेसह दोन थायलंडच्या नागरिकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे युद्धविराम होण्याच्या एक दिवस आधी गुरुवारी (20 मे) देखील इस्राईलने गाझावर 100 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले होते. 10 मेपासून इस्राईल आणि हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती (Israel Palestine Conflict). त्यानंतर हमासने इस्राईलवर अनेक रॉकेट हल्ले केले. मात्र, इस्राईलच्या एअर डिफेंस सिस्टम आयर्न डोम यंत्रणेने हे रॉकेट हवेतच नष्ट केले (Rocket Attacks). त्यामुळे फार नुकसान झालं नाही. 11 मे रोजी या आयर्न डोममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हमासचे रॉकेड इस्राईलमध्ये पडले. मात्र, नंतर लगेचच ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली.
इस्राईलने हमासचे 150 लोक मारल्याचा दावा केलाय. मात्र, हमासने अधिकृतपणे मृतांची संख्या सांगितलेली नाही. असं असलं तरी गाझातील अनेक मोठमोठ्या इमारतींना इस्राईलच्या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय.