PHOTOS : जगातील सर्वात महागडी पार्किंग, एवढ्या किमतीत आलिशान घरही बांधून होईल
जगातील सर्वात महागडी पार्किंग हाँगकाँगमध्ये आहे. हे शहर तेथील लग्जरियस लाईफस्टाईलसाठीही ओळखलं जातं. नुकतीच जगातील सर्वात महागड्या पार्किंगचा व्यवहार झाला.
जगातील सर्वात महागडी पार्किंग हाँगकाँगमध्ये आहे. हे शहर तेथील लग्जरियस लाईफस्टाईलसाठीही ओळखलं जातं. नुकतीच जगातील सर्वात महागड्या पार्किंगचा व्यवहार झाला. त्याची किंमत ऐकून जगभरात त्याची चर्चा आहे.
Follow us on
जगातील सर्वात महागडी पार्किंग हाँगकाँगमध्ये आहे. हे शहर तेथील लग्जरियस लाईफस्टाईलसाठीही ओळखलं जातं. नुकतीच जगातील सर्वात महागड्या पार्किंगचा व्यवहार झाला. त्याची किंमत ऐकून जगभरात त्याची चर्चा आहे.
या पार्किंगचं क्षेत्रफळ 134.5 चौरस फूट आहे. ही जागा 74,350 डॉलर प्रती चौरस फूट दराने विकण्यात आलंय. या हिशोबाने या संपूर्ण जमिनीची किंमत 1.3 मिलियन डॉलर म्हणजेच 9,50,91,165 रुपये आहे.
जर जमिनीची किंमतच इतकी असेल तर या भागातील घरांची किंमत किती असेल याचा अंदाजच केलेला बरा. इतकंच नाही तर या पार्किंगची किंमत हाँगकाँगमधील मुख्य रहिवासी भागातील घरांच्या किमतींपुढे काहीच नाही इतक्या आहेत. या भागात एक जमिनीचा तुकडा घ्यायला जितके पैसे लागतील तितक्या पैशात दुसरीकडे आलिशान घर बांधून होईल.
ही पार्किंग सध्या तरी सर्वात महागडी ठरलीय. याआधी हा रेकॉर्ड 2019 मध्ये नोंदवण्यात आला होता. 2017 मध्ये पहिल्यांदा एका व्यक्तीने येथे 2 अपार्टमेंट्सला 10 अरब रुपयांपेक्षा अधिक किमतीला खरेदी केलं होतं. तेव्हापासूनच या भागाची ओळख त्या इमारतीवरुन झाली.
हाँगकाँग जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. येथील सर्वात पॉश भागातील घराचं वार्षिक भाडं 18 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जगातील सर्वात महागडी पार्किंग एका बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये आहे. ही इमारत 73 मजली उंच आहे. या इमारतीचं नाव ‘द सेंटर’ असं आहे.