ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे सध्या अडचणीत सापडले आहे. त्यांची पत्नी व्हिक्टोरिया यांना कामगार पक्षाचे प्रमुख दानकर्ते वहीद अली यांनी महागडे कपडे, इतर सामान गिफ्ट दिले. हा सर्व प्रकार लपविण्याची कसरत पंतप्रधानांनी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सर्व प्रकारामुळे स्टार्मर आता अडचणीत आले आहे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. संडे टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे.
संसदीय नियमांचे उल्लंघन
लेबर पार्टीचे प्रमुख दानकर्ते अली यांनी पंतप्रधानांच्या पत्नीला महागडे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करुन दिले. त्याची माहिती पंतप्रधान स्टार्मर यांनी दिली नाही. या सर्व गोष्टींची त्यांनी संसदेच्या रजिस्टरमध्ये नोंद केली नाही. त्याचा त्यांना फटका बसला आहे. हे गिफ्ट देण्यामागे काय कारण हे पण समोर आलेले नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या अडचणी वाढल्या आहेत.
काय सांगतो नियम
ब्रिटनच्या पार्लमेंट नियमानुसार, खासदारांना 28 दिवसांच्या आत त्यांना देण्यात आलेल्या भेट वस्तूंची माहिती द्यावी लागते. कोणतेही गिफ्ट देण्यात आले असेल तर त्याची माहिती देणे संसद सदस्याला बंधनकारक आहे. हे गिफ्ट त्यांचे संसदेतील राजकीय वजन अथवा प्रभावामुळे देण्यात आले असले तरी त्याची माहिती देणे सदस्यांना बंधनकारक आहे. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे लोकसभेतील सदस्यांना कोणी आर्थिक स्वरुपाची भेट देत असेल तर त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. सदस्याला प्रभावित करण्याचा हा प्रकार असल्याचे तिथल्या नियमात म्हटले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास सदस्याला चौकशीला सामोरे जावे लागते.
काय दिले गिफ्ट
संसदेच्या वेबसाईटनुसार, लॉर्ड एली यांनी पंतप्रधान यांच्या पत्नीला अनेक वस्तू भेट स्वरुपात दिल्या आहेत. त्यात चष्मा, कपडे आणि राहण्याची सुविधा यांचा समावेश आहे. संडे टाईम्सनुसार ,या भेट वस्तूंची माहिती समोर आली. त्यात महागडे कपडे भेट दिल्याची माहिती देण्यात आली नव्हती. एली यांनी पंतप्रधानांच्या पत्नीला राहण्यासाठी खास निवास स्थानाची सोय केली होती. त्यासाठी जवळपास 22 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.