PM Modi Nordic countries visit :नॉर्डिक देशातील नेत्यांची मनं नरेंद्र मोदींनी जिंकली; भारतातील खास वस्तू भेटीच्या स्वरुपात

| Updated on: May 05, 2022 | 1:24 AM

डेन्मार्कच्या महाराणी क्वीन मार्गरेट यांनाही पंतप्रधान मोदींनी खास भेट देऊन सन्मानित केले. त्यांनी गुजरातमध्ये बनवलेले रोगन पेंटिंग राणीला सादर केले. कपड्यांवर छापण्याची ही खास कला त्याला खास बनवते.

PM Modi Nordic countries visit :नॉर्डिक देशातील नेत्यांची मनं नरेंद्र मोदींनी जिंकली; भारतातील खास वस्तू भेटीच्या स्वरुपात
नॉर्डिक देशातील नेत्यांची मनं नरेंद्र मोदींनी जिंकली; भारतातील खास वस्तू भेटीच्या स्वरुपात
Image Credit source: twitter
Follow us on

कोपनहेगनः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलेला नॉर्डिक देशांचा (Nordic countries) दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. या देशांच्या नेत्यांसोबत भारताचे सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय (Cultural, economic and political) संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन या देशांच्या नेत्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.

या दौऱ्यामुळे संबंध दृढ

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांच्याकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले की, कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत भारताबरोबर निर्माण झालेले संबंध या दौऱ्यामुळे दृढ होणार आहेत. हा दौरा दुसरा एका कारणामुळे खास ठरला आहे. नॉर्डिक देशांच्या नेत्यांसोबतची त्यांची भेट खास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास भेटवस्तूही दिल्या आहेत.

छत्तीसगडमध्ये बांधलेली डोक्रा बोट भेट

डेन्मार्कचे क्राउन प्रिन्स फ्रेडरिक यांना पंतप्रधानांनी छत्तीसगडमध्ये बांधलेली डोक्रा बोट भेट देण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये तयार करण्यात येत असलेली ही कलाकृती खूप खास आहे. हे नॉन-फेरस धातूपासून बनविण्यात आले आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी मेणाचा वापर केला जातो. या प्रकारची कलाकृती भारतात 4 हजार वर्षांहून अधिक काळापासून तयार केली जात आहे.

गुजरातमधील रोगन पेंटिंग

डेन्मार्कच्या महाराणी क्वीन मार्गरेट यांनाही पंतप्रधान मोदी यांनी खास भेट देऊन सन्मानित केले. त्यांनी गुजरातमध्ये बनवलेले रोगन पेंटिंग राणीला प्रेमपूर्वक दिले आहे. ही कलाकृतीचे खास वैशिष्ट्ये हे आहे की, कपड्यांवर छापण्याची त्यांची म्हणून एक खास शैली आहे. गुजरातमधील कच्छमध्ये ही कलाकृती तयार केली जाते. या कलाकृतीमध्ये उकळलेले तेल आणि भाज्यांचे रंग वापरले जातात.

पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कच्या क्राउन प्रिन्स मेरी यांना वाराणसीची खास ओळख असलेला सिल्व्हर मीनाकारी पक्षी भेट दिला. वाराणसीची ही कला सुमारे 500 वर्षाहून अधिक जुनी आहे. पर्शियन कलेचा नमुनाही या कलेत सापडतो.


जीवनाच्या प्रगतीचे झाड

पंतप्रधानांनी फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांना राजस्थानचे ‘ब्रास ट्री ऑफ लाइफ’चे वैशिष्ट्य सादर केले. हे झाड जीवनाच्या प्रगतीचे आणि विकासाचे प्रतीक मानले जाते. या झाडाची पाने आणि फांद्या सर्वसमावेशक जीवनाचे विविध रूप दर्शवतात. पंतप्रधानांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना राजस्थानमध्ये बनवण्यात आलेली ढाल भेट दिली.