नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर चालले आहेत. लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्याने या दौऱ्या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही करारासंदर्भात घोषणा केली जाणार नाही. तरीही हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी अलिकडेच भारताचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांचा दौरा होत आहे. एकीकडे निवडणूकांची घोषणा केली आहे आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात असल्याने या दौऱ्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी साल 2009 मध्ये देखील भारताचे तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी देखील निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर ब्रिटनचा दौरा केला होता. त्यावेळी मनमोहन सिंह जी-20 शिखर संमेलनासाठी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21-22 मार्च रोजी भूतानच्या छोट्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा दोन देशांसाठी खूपच महत्वाचा आहे. चीन सोबत आपल्या संबंध तणावाचे असताना हा दौरा होत आहे. त्यामुळे भारतीय परराष्ट्रनीतीच्या दृष्टीने हा महत्वाचा दौरा आहेय. शेरिंग सरकार असताना चीन सोबत सीमावाद सोडविण्यास मदत झाली होती. त्यावेळी चीन आणि भूतान दरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला होता.
भारत, भूतान आणि चीन यांच्या सीमा अनेक ठिकाणी ‘चिकन्स नेक’ मध्ये परावर्तित झालेल्या आहेत. चीन आणि भारतीय सैन्यात दोन वर्षांपूर्वी डोकलाम येथे चकमक झाली होती. हा परिसर ट्राय जंक्शनचा होता. पूर्वोत्तर परिसरात अशा सीमा संवदेनशील असतात. भूतान आणि चीन दरम्यान झालेल्या सामंजस्य करारात सीमांची अदलाबदल करण्याचा देखील करार होता. जानेवारी महिन्यात पदभार सांभाळल्यानंतर भूतानचे पंतप्रधान पहिल्यांदा परदेश भेटीवर भारतात आले होते. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला भेट देऊन दोन्ही देशांचे संबंध दृढ करु इच्छित आहेत.