बँकॉक : कुणाचं नशिब कसं उजळेल हे काही सांगता येत नाही. कधीकधी आयुष्यात इतके अनपेक्षित योगायोग घडतात की आपल्यालाही हे योगायोग चमत्कार वाटतात. अशीच एक घटना थायलंडमधील एका गरीब महिलेसोबत घडलीय. गरीब परिस्थितीमुळे परवडणारं समुद्री अन्न विकत घेणाऱ्या या महिलेने एक दिवस जेवणात भाजी करण्यासाठी 163 रुपयांच्या समुद्री गोगलगाय विकत घेतल्या. मात्र, त्या साफ करुन भाजीसाठी चिरताना तिला त्यात कोट्यावधींचा दुर्मिळ मोती सापडलाय (Poor women found Melo pearl of crores of rupees in sea snails in Thailand).
गोगलगाईच्या आवरनात केसरी रंगाचा खडा
कोडचाकोर्न नावाच्या या महिलेने दैनंदिन सवयीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी एका विक्रेत्याकडून 163 रुपयांच्या समुद्री गोगलगाय घेतल्या. घरी आल्यावर भाजीसाठी या गोगलगाय साफ करुन त्याचे छोटे छोटे तुकडे करताना त्यांना एका गोगलगाईच्या आवरनात केसरी रंगाचा खडा सापडला. सुरुवातील या महिलेला हा खडकाचा तुकडा किंवा दगड असेल असं वाटलं.
दगड नाही, तर दुर्मिळ प्रकारचा 6 ग्रॅम वजनाचा मोती
या महिलेने या दगडाची व्यवस्थित माहिती घेतल्यानंतर हा दगड नसून दुर्मिळ प्रकारचा 6 ग्रॅम वजनाचा मोती असल्याचं तिला समजलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हा मोती 1.5 सेमी व्यासाचा आहे. त्याची बाजारातील किंमत कोट्यावधी रुपये आहे. विशेष म्हणजे हा मोती अनेक रंगछटांमध्ये सापडतो. मात्र, त्यातील केसरी/नारंगी रंगाचा मोती सर्वात जास्त महागडा आणि दुर्मिळ मानला जातो. या महिलेला नेमका असाच मोती सापडला आहे.
मासे विक्री करणारा आपल्याकडे मागेल म्हणून मोती सापडल्याचं गुप्त ठेवलं
गरीबीत आयुष्य काढलेल्या या महिलेने गोगलगाई विकत आणल्या तो आपल्याकडे हा मोती मागेल या भीतीने सुरुवातीला ही गोष्ट गुप्त ठेवली. मात्र, आता घरात आईला कॅन्सर झाल्याने आणि वडिलांचा अपघात झाल्याने तिला उपचारासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे तिने हे गुपित तोडत आपल्याकडे असा मोती असल्याचं सांगितलंय. तसेच योग्य किंमत देणाऱ्या व्यक्तीला हा मोती विकणार असल्याचं म्हटलंय.
हेही वाचा :
खाणीत सापडला 378 कॅरेटचा लखलखीत हिरा, किंमत वाचून डोळेही लखलखतील
एका रात्रीत शेतकरी झाला मलामाल, शेतात काहीतरी चमकताना दिसलं आणि…!
व्हिडीओ पाहा :
Poor women found Melo pearl of crores of rupees in sea snails in Thailand