पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत दाखल झाले आहेत. येथे भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जर्मनीतील नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यादरम्यान एका भारतीय-जर्मन वधू-वर जोडीनेही पंतप्रधानांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वादही घेतले. याचा व्हिडिओ या जोडप्याने सोशल मिडीयावर शेअर केला असून हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
दोन महिन्यांतील मोदींचा हा दुसरा जर्मनी दौरा आहे. यापूर्वी ते २ मे रोजी जर्मनीला गेले होते. पंतप्रधान संध्याकाळी म्युनिकमध्ये परदेशी भारतीयांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. आणीबाणीचा संदर्भ देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जी लोकशाही आपला अभिमान आहे, जी लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये आहे. 47 वर्षांपूर्वी या दिवशी आणीबाणी लादून लोकशाहीला ओलिस ठेवण्याचा, लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असे ते म्हणाले.
योग की ताकत क्या है, इसे दुनिया ने भारत से भलीभांति समझा है। इसके साथ ही अब भारत प्राचीन चिकित्सा पद्धतियों का ग्लोबल सेंटर भी बन रहा है। pic.twitter.com/lne0iGUkWr
— Narendra Modi (@narendramodi) June 26, 2022
मी तुमच्या सर्वांमध्ये भारताची संस्कृती, एकता आणि बंधुता पाहत आहे. भारतातील जनतेने लोकशाही चिरडण्याच्या सर्व कारस्थानांना लोकशाही मार्गाने उत्तर दिले. आपण भारतीय जिथे आहोत तिथे आपल्याला लोकशाहीचा अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणतो, भारत ही लोकशाहीची जननी आहे.