नवी दिल्ली : ब्रिटनच्या (Queen Elizabeth II) महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सबंध जगभरातून शोकसंदेश सुरु झाले आहेत. येथील नागरिक त्यांना जड अंतकरणाने निरोप देत आहेत. तर त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये ‘ऑपरेशन लंडन ब्रिज’ हे लागू करण्यात आले आहे. हा एक ब्रिटनमधील (Protocol) प्रोटोकॉल असून निधनाची वार्ता समोर येताच तो लागू करण्यात आला आहे. आता 10 दिवसांसाठी तो कायम असणार आहे. निधनानंतर 10 व्या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या (Cremation of the body) पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव हे आता काही दिवस स्कॉटलंड येथे असणार आहे. त्यानंतर मात्र, ते लंडनला विशेष विमानाने किंवा शाही ट्रेनने नेले जाणार आहे. ऑपरेशन लंडन ब्रिज अंतर्गत हा विधी सुरु राहणार आहे. याच राणीच्या मृत्यू दिवसाला डी-डे असे संबोधले जाणार आहे. एलिझाबेथ द्वितीय यांचे स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले, त्यामुळे तेथे ऑपरेशन युनिकॉर्न राबविण्यात आले आहे. त्यानंतर 10 दिवस नेमके काय असणार हे देखील आपण पाहणार आहोत.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव ब्रिटनमध्ये शाही ट्रेनने आणल्यानंतर सर्वात प्रथम सरकारच्यावतीने येथील पंतप्रधान राजा चार्ल्स हे जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुखवटा म्हणून या रॉयल फॅमिलीची वेबसाईटही काळवंडली जाणार आहे. त्यानंतर राणीच्या मृत्यूची पुष्टी केली जाणार. त्यानंतर मात्र, सोशल मिडियासह सरकारी वेबसाईटवर देखील बॅन असणार आहे.
राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर 24 तासाच्या आतमध्ये जेम्स पॅलेसमध्ये चार्ल्सला राजा म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणीचे पार्थिव हे बकिंगहॅमच्या पॅलेसमध्ये आणले जाणार. ट्रेनने ते लंडनला नेले जाणार आहे. लंडनमधील पंतप्रधानांकडून पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
तिसऱ्या दिवशी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये शोक प्रस्ताव असणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी नवा राजा असलेले चार्ल्स हे ब्रिटनमध्ये दौरा करणार आहेत. राणीची शवपेटी ही बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टरच्या पॅलेसमध्ये हलविण्यात येणार त्यापूर्वी लायन येथे एक तालीमही होणार आहे. वेस्टमिन्स्टरमध्ये एक कार्यक्रमही पार पडणार आहे.
ब्रिटनमध्ये विविध कार्यक्रम झाल्यानंतर राणींचे पार्थिव हे तीन दिवसांसाठी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्वसामान्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करता येणार आहे. दिवसभर हा कार्यक्रम सुरु राहणार असून किंग चार्ल्स हे पुन्हा एकदा शोकसभा घेणार आहेत. तर दहाव्या दिवशी राणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.