नवी दिल्ली : आपला शेजारी असलेल्या नेपाळमध्ये थेट चीनने आपला रेल्वेमार्ग सुरू केल्याची घोषणा आज केल्याने खळबळ उडाली आहे. हा रेल्वे मार्ग मालवाहतूकीचा मार्ग असल्याचे चीनने जाहीर केले आहे. चीनशी आपले संबंध नेहमीच तणावाचे राहीले आहेत. त्यात आता नेपाळमध्ये थेट चीनची रेल्वे पोहचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गामुळे चीन आता थेट नेपाळमध्ये मालवाहतूक करू शकणार आहे. तसेच आपले सामरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन हवे ते साहित्य नेपाळला पाठवू शकणार आहे.
जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून गौरविल्या जाणाऱ्या नेपाळशी चीनच्या असलेल्या मैत्रीचा आता आणखी एक पुरावा समोर आला आहे. चीनने नेपाळशी जोडणारा आपला पहिला रेल्वे मार्ग अखेर सुरू केला आहे. त्यामुळे आता भारताची चिंता मात्र आता वाढली आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाने आज नेपाळला जाणारा रेल्वे मार्ग सुरू झाल्याचे आज जाहीर केले आहे.
चीनी विदेशमंत्रालयाचे अधिकारी जी रोंग यांनी चीनच्या गांसू प्रांताच्या लांझू शहरातून दक्षिण आशियासाठी आज मालगाडी रवाना झाल्याचे म्हटले आहे. ही मालगाडी नेपाळची राजधानी कठमांडूला येत्या 9 ते 10 दिवसात पोहचणार आहेत. चीनचे विदेश मंत्रालयाचे अधिकारी जी रोंग यांनी म्हटले आहे की या नव्या ट्रेनमुळे नेपाळला मालवाहतूक करणे सोपे होणार आहे. नेपाळला पूर्वी समुद्रमार्गे वस्तू पाठवायला लागायच्या त्यामुळे खूप वेळ लागायचा. आता नव्या रेल्वे मार्गामुळे याच कामासाठी अंत्यंत कमी वेळ लागणार असून एकूण पंधरा दिवसांची बचत होणार आहे.
नेपाळचे परराष्ट्र अधिकारी जी रोंग यांनी ट्वीट करीत पहिली साऊथ एशियाला मालगाडी लांझू प्रांतातून बुधवारी रवाना झाल्याचे म्हटले आहे.
उत्तर – पश्चिम चीनच्या लांझू मधून न्यू इंटरनॅशनल लॅंड सि ट्रेड कॉरीडॉरची ही ट्रेन रवाना झाली असून ती समुद्र मार्गापेक्षा 9 ते 10 दिवस आधी काठमांडूला पोहचणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.
The first #SouthAsia-bound freight train from Lanzhou in NW #China’s Gansu via the New International Land-Sea Trade Corridor departed for Kathmandu, #Nepal on Wednesday. The train is expected to arrive in 9-10 days, saving 15 days compared with sea shipping. pic.twitter.com/PvxphpjIgl
— Ji Rong嵇蓉 (@JiRongMFA) February 24, 2023
नेपाळमध्ये पंतप्रधान प्रचंड यांचे डाव्यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. जेव्हा नेपाळमध्ये पंतप्रधान प्रचंड यांचे सरकार आले, तेव्हा
चीनमध्ये असलेले नेपाळचे राजदूत बिष्णू पुकार यांनी समाधान व्यक्त केले होते. एवढंच काय बिजींग प्रशासानानेही नेपाळच्या सरकारला पाठिंवा देत नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. तर चीनचे पंतप्रधान केकीयांग यांनीही प्रचंड यांना शुभेच्छा देत आता चीन- नेपाळ संबंध आणखीन वृद्धीगंत होतील असे म्हटले होते.