बँकॉक : स्वप्न तर सर्वच बघतात पण काहीच जणांची स्वप्न पूर्णत्वास येतात (Rare Melo Orange Pearl). असंच काहीसं एका मासेमारी करणाऱ्यासोबत झालं आहे. त्याच्या हाती तब्बल 2.5 कोटी रुपयांचा खजिना हाती लागला आहे. या मच्छीमाऱ्याला नारंगी रंगाचा एक दुर्मिळ मोती मिळाला आहे (Rare Melo Orange Pearl).
समुद्रातून अनेकदा मौल्यवान वस्तू बाहेर पडत असल्याच्या घटना आपण वाचत असतो. कधी दुर्मिळ मासे तर कधी काय सापडत असतं. ही घटना थायलंडची असून एका मासेमारी करणार्या हचाई नावाच्या व्यक्तीला हा दुर्मिळ मोती सापडला आहे.
या थायलंडच्या किनाऱ्याजवळ एक buoy मिळाली होती. यावर अनेक शिंपले लागले होते. यापैकी तीन स्नेल शेल होते. हचाई आणि त्यांचा भाऊ हे शिंपले घेऊन घरी गेले आणि आपल्या वडिलांना दाखवलं. शिंपल्याला स्वच्छ करताना त्यांना मोती दिसला. हा दुर्मिळ नारंगी मोती सी स्नेल Melo Melo पासून बनतो आणि शेलमध्येच राहतो (Rare Melo Orange Pearl).
37 वर्षीय हाचाई यांनी सांगितले की, त्यांना काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात एका वयोवृद्ध व्यक्तीने समुद्रा किनार्यावर बोलावलं होतं आणि एक भेट घेऊन जा, असं सांगितलं होतं. माझं भाग्य मला मोत्यापर्यंत घेऊन आलं. आता तो मोती जास्त किंमतीला विकण्याचा प्रत्यन करेल. जेणेकरुन कुटुंबाचं नशीब बदलेल. त्यांना या मोत्याला 10 मिलियन थाई बात म्हणजे 2.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक इतकी किंमत मिळावी अशी अपेक्षा आहे.
चीनच्या एका व्यापाऱ्याने हा मोती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, आतापर्यंत या मोत्याला विकलं गेलेलं नाही.
नशिबाची ‘कम्माल’… ५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट\https://t.co/iF3IEab3gW
#lost#wallet#found#after#53years
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
Rare Melo Orange Pearl
संबंधित बातम्या :
Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?
जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई