मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांना राजीनामा द्यावा लागल्याने पुन्हा निवडणुकांचे वारे वाहत आहे. यात भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता वाढली आहे. कारण मतमोजणीच्या दुसऱ्या राऊंडमध्येही (Second Roud Voting) त्यांचं पारडं जड राहिलं आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत आधी त्यांनी मोठी आघाडी घेतली तर आता दुसऱ्या फेरीतही त्यांनी मोठी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पहिल्या फेरीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली असून, दोन उमेदवारही बाद झाले आहेत. पहिल्या फेरीत ऋषी सुनक यांना 25 टक्के मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर पेनी मॉर्डंट यांना 19 टक्के मते मिळाली. एलिमिनेशन फेरीत नदीम जाहवीला सात टक्के आणि जेरेमी हंटला पाच टक्के मिळाले. ही संख्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वात कमी होती, ज्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. आता ही आघाडी शेवटपर्यंत अशी राहणार का? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठारणार आहे.
Former British finance minister Rishi Sunak won the most votes in the second round of voting to succeed Boris Johnson as leader of the Conservative Party and prime minister, as one candidate was eliminated: Reuters
(File photo) pic.twitter.com/8dWrclWrJe
— ANI (@ANI) July 14, 2022
ब्रिटनचे पुढील पंतप्रधान निवडण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी नामांकनांची प्रारंभिक फेरी संपल्यानंतर दोन भारतीय वंशाचे खासदार-माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन-आठ दावेदारांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात आता सुनक हे चांगलेच आघाडीवर आहेत.
ऋषी सुनक यांना बहुतांश खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या प्रचाराची सुरुवात करताना 42 वर्षीय सुनक म्हणाले, “मी एक सकारात्मक मोहीम चालवत आहे ज्यामध्ये माझ्या नेतृत्वामुळे पक्ष आणि देशाला काय फायदा होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित केले जाते.” मूळ गोव्यातील सुएला ब्रेव्हरमन, आता ब्रिटीशमध्ये ऍटर्नी जनरल आहेत. मंत्रिमंडळ आणि 2015 पासून खासदार आहेत. नामांकन प्रक्रिया पूर्ण होण्याच्या काही वेळापूर्वी दोन पाकिस्तानी वंशाचे उमेदवार माजी आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि परराष्ट्र कार्यालय मंत्री रहमान चिश्ती यांनी आपले नामांकन मागे घेतले कारण ते 20 खासदारांचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची निवड 5 सप्टेंबरला होणार आहे.