रशियाच्या (rassia) हल्ल्याला आज 9 दिवस पुर्ण होत असून रशियाकडून हल्ल्याची तीव्रता वाढली असल्याची पाहायला मिळत आहे. रशियाने मागच्या 8 दिवसात कीव (keiv) आणि खारकीव मधील अनेक महत्त्वाची स्थळ उद्ववस्त केल्यानंतर आता चेर्नोबिलमध्ये (chernihiv) हल्ला करायला सुरूवात केली आहे. युक्रेनमधील दिलेल्या मीडियाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत तिथं रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी झाले आहेत. युक्रेनने हा हल्ला रहिवासी परिसरात केला असल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या अधिकार्यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली असल्याचा दावा केला आहे. शियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 नागरिक मारले असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. त्यामुळं युक्रेनमध्ये किती भयानक परिस्थिती असेल हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहतोय.
Russia Ukraine War Updates: चेर्नहिव्हमध्ये रशियाच्या हल्ल्यात घरे, रस्ते, पूल सर्वकाही नष्ट pic.twitter.com/dVukBS7vLX
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2022
काही तासाच चेर्नहिव्ह उद्वस्त
मागच्या 8 दिवसात हल्ल्याची तीव्रता कमी होती. परंतु सध्याची तिथली परिस्थिती पाहता हा हल्ला एकदम भयानक असल्याचं पाहायला मिळतंय. चेर्नहिव्हमध्ये घरे, रस्ते, पुल सगळ काही उद्वस्त केल्याचं पाहायला मिळत आहे. त्या परिसरात रशियाकडून जोरदार हल्ला होत असल्याने स्मशान शांतता पसरली आहे. चेर्नोबिलमध्ये रशियाकडून वास्तव करीत असलेल्या परिसरात हल्ला केल्याने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले आहेत. त्यामुळं तिथं राहत असलेली लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. चेर्नहिव्हमध्ये हल्ला केल्यानंतर तिथले काही फोटो व्हायरल झाले आहेत.
युरोपच्या सगळ्यात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवरती हल्ला
सध्या रशियाने केलेल्या हल्ल्यात युरोपच्या सगळ्यात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवरती हल्ला केला आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर प्लांटमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर तिथं धुराचे लोढे दिसत आहेत. त्यामुळे त्याला आग लागली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता युक्रेनला मिळणारी 25 टक्के लाईट आता गायब होईल. या प्लांटमधून युक्रेनमध्ये 25 टक्के वीज देण्यात येत होती. तिथल्या एका स्थानिक अधिका-याने युक्रेनच्या मीडियाला सांगितलं आहे की, आग विझवण अत्यंत गरजेचं आहे.
2000 लोकांचा मृत्यू झाल्याचा युक्रेनचा दावा
युक्रेनच्या अधिकार्यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या युद्धात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. तर ५२५ जखमी आहेत. त्याच वेळी, युक्रेनचे म्हणणे आहे की रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 नागरिक मारले गेले आहेत. रशियाने सुध्दा पहिल्यांदा सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. ते म्हणतात की आत्तापर्यंत झालेल्या युद्धात 500 सैनिक मारले गेले आहेत, त्याचबरोबर 1600 सैनिक जखमी झाले आहेत.