मुंबई : रशिया-युक्रेन (Ukraine) यांच्यामधील संघर्ष वाढत आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना (Students) स्वगृही आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे सहकार्य नक्कीच मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supirya Sule) यांनी व्यक्त केला आहे. आपली मुले विदेशात अडकली आहेत या भीतीने पालकांमध्ये अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यासाठी देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्कात आहोत, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. कोरोना संक्रमण काळात परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी वेळोवेळी त्यांचे आभारही मानले आहेत. यावेळीदेखील अशाच प्रकारचे सहकार्य त्यांच्याकडून लाभेल, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
प्रशासनाचे आवाहन काय?
सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून मुंबई शहर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे. देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.
या नंबरवर संपर्क साधा
● टोल फ्री – 1800118797
● फोन 011-23012113 / 23014105 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क
साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,मुंबई शहरच्या 022- 22664232 या दूरध्वनी क्रमांकावर आणि mumbaicitync@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी शेवटी केले आहे.
पुतिन काय म्हणाले?
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी राजधानी कीवमधील विद्यमान सरकार हटवण्यास सांगितलं आहे. ‘मी पुन्हा एकदा यूक्रेनच्या सैन्यातील सैनिकांना आवाहन करतो. नव-नाझी आणि यूक्रेनी कट्टरपंथी राष्ट्रवाद्यांना आपली मुलं, बायका आणि वृद्धांना मानवी ढाल म्हणून वापर करु देऊ नका’, असं शुक्रवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेत टीव्हीवर झालेल्या एका बैठकीत पुतिन म्हणाले. सत्ता तुमच्या हातात घ्या, त्यानंतर आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असंही पुतिन म्हणाले. तसंच यूक्रेनमध्ये रशियन सैन्य मोठी बहादुरी आणि शौर्य दाखवत आहेत, अशा शब्दात पुतिन यांनी रशियन सैन्याचं कौतुक केलं आहे.
जगातील या 5 देशांची आर्मी आहे सर्वात भयंकर ,भारतीय सेना आहे या क्रमांकांवर !