Video : रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला, समोरुन आलेल्या कारला चिरडलं, नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 26, 2022 | 5:57 PM

रशियानं सुरुवातीला आम्ही नागरी वस्ती अरणाऱ्या ठिकाणी हल्ले करत नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणी हल्ले सुरु ठेवल्याचं दिसून येत आहेत.

Video : रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला, समोरुन आलेल्या कारला चिरडलं, नेमकं काय घडलं?
रशियन टँकनं कारला चिरडलं
Image Credit source: NBC: Instagram
Follow us on

Russia Ukraine Crisis : रशियानं (Russia) यूक्रेनविरोधात (Ukraine) युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनच्या महत्त्वाच्या शहरात हल्ले केले आहेत. यूक्रेनच्या राजधानी कीवसह (Kyiv) खारकीव या प्रमुख शहरांवर रशियाकडून हल्ले करण्यात आलेले आहेत. रशियानं सुरुवातीला आम्ही नागरी वस्ती अरणाऱ्या ठिकाणी हल्ले करत नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणी हल्ले सुरु ठेवल्याचं दिसून येत आहेत. रशियाचं सैन्य यूक्रेनच्या विविध शहरांमध्ये रणगाडे, टँक, ट्रकसह फिरताना दिसून येत आहेत. रशियन सैन्य आणि यूक्रेनचे सामान्य नागरिक यांच्यात संघर्ष होत असताना दिसत आहे. यूक्रेनचे नागरिक रशियन सैन्याला पकडत असताना देखील दिसून येत आहे. रशियन सैन्य आणि यूक्रेन नागरिक यांच्यातील संघर्षाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रशियन सैन्याचा टँक रस्त्यावरुन फिरत आहेत. यापैकी एका टँकनं एका कारला चिरडलं असल्याचं समोर आलं आहे. त्या कारमध्ये एक व्यक्ती होता.

पाहा व्हिडीओ:

एनबीसी न्यूजनं याविषयी एक व्हिडीओ जारी केला आहे. यूक्रेनची राजधानी कीव शहरावर हल्ला करण्यासाठी रशियन टँक रस्त्यानं जात होता. रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला. यामुळं समोरुन येणाऱ्या कारला त्या टँकनं चिरडलं. मात्र, ही घटना नेमकी कधी घडलीय हे स्पष्ट झालं नाही. या व्हिडीओत लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला येत आहे. यूक्रेनचे पत्रकार आणि काही नागरिकांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीड्या साईठवर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारचालक व्यक्तीचा जीव वाचला आहे.

रशिया यूक्रेन संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

कीवमध्ये कर्फ्यू लागणार

यूक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थानिक प्रमाण वेळेनुसार 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागू होईल. कीववर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. रशियाचं सैन्य कीवपासून 30 किमी अंतरावर असल्यानं कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आहे. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनमधील नागरिक देश सोडून जात आहेत. देशाबाहेर जाणाऱ्या मार्गांवर रांगा लागल्या आहेत.

अमेरिका यूक्रेनला 26 अब्ज रुपये देणार

अमेरिकेनं यूक्रेनला 26 अब्ज रुपये म्हणजे 350 मिलियन अमेरिकन डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन आक्रमणाला तोंड देण्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : युक्रेन सीमेनजीक रशियाच्या 150 लढाऊ हेलिकॉप्टर्ससह लाखो सैनिक, सॅटेलाईट फोटोतून धडकी भरवणार वास्तव

Russia Ukraine War Live : यूक्रेनची राजधानी कीव शहरात 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागणार