रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा सोळावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर मिसाईलचा मारा सुरू आहे. यामध्ये युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत बारा लाखांपेक्षा अधिक लोकांनी युक्रेन सोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास एक लाख लोकांना युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. यामध्ये काही परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. चौदा मार्चला रशियाकडून युक्रेनमध्ये दुसरा युद्धविराम घेण्यात आला होता.
Around 1,00,000 people evacuated from Ukraine cities in two days, said President Volodymyr Zelensky: AFP News Agency
(File Pic) pic.twitter.com/7W7MkdkXT4
— ANI (@ANI) March 10, 2022
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या रशियाच्या युद्धामुळे अमेरिकेने आधी रशियाकडून तेलाची आणि गॅसची आयात बंद केली होती. आता व्यापरावरही बंदी घेतली आहे.
The United States will revoke Russia’s ‘permanent normal trade relations’ status: US President Joe Biden pic.twitter.com/JSz8uCfaUm
— ANI (@ANI) March 11, 2022
रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेत काही सकारात्मक बदल झाल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले. पुतीन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा दोन आठवडे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रंट्सने म्हटले आहे की दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर सुमारे 2.5 दशलक्ष लोकांनी देश सोडला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) चे प्रवक्ते पॉल डिलन यांनी एका संदेशात म्हटले आहे की सरकारकडून मिळालेली संख्या ही अशी आहे ज्यांनी शुक्रवारी सकाळपर्यंत देश सोडला आहे. त्यांनी सांगितले की 1.5 दशलक्षाहून अधिक निर्वासित शेजारच्या पोलंडमध्ये गेले आहेत आणि सुमारे 116,000 निर्वासित इतर देशांचे नागरिक आहेत.
युक्रेनने रशियन रणगाडे उद्ध्वस्त केले आणि ‘टॉप कमांडर कर्नल आंद्रेई झाखारोव्हला ठार केले’.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी युक्रेनियन महिला आणि तिच्या तीन मुलांना देशात आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी, बायडेन प्रशासनाने लादलेल्या व्यापक निर्बंधांनुसार महिलेला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. 34 वर्षीय महिला आणि तिची 6, 12 आणि 14 वर्षांची तीन मुले सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सॅन दिएगो येथे पोहोचली आहेत.
युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे युक्रेनमधून अनेक नागरिक स्थलांतर करत आहेत. अशा स्थलांतरील नागरिकांना कॅनडा आश्रय देणार असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे. ते पोलंड दौऱ्यावर असताना बोलत होते.
रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर : ‘Disney’ मोठा निर्णय घेतला आहे. डिस्नेने रशियामधून आपला व्यवसाय गुंडळण्याची तयारी सुरू केलीये.
Disney to pause all businesses in Russia after halting theatrical releases in the country
Read @ANI Story | https://t.co/RZruQkhTsT pic.twitter.com/cATrTmOCiD
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2022
रशियाने युक्रेनवर लादलेले हे युद्ध दहशतवादी युद्ध आहे. रशियाने युद्धात सैनिक कमी आणि युक्रेनियन नागरिकच जास्त मारले असा दावा युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी केला आहे.
अमेरिकेकडून युक्रेन आणि नाटोचे सदस्य असलेल्या देशांसाठी 13.6 अब्ज डॉलरच्या आपत्कालीन पॅकेजला अंतिम मंजुरी
The (US) Senate has given final congressional approval to a $13.6 billion emergency package of military and humanitarian aid for #Ukraine and its European allies: Associated Press reports
— ANI (@ANI) March 11, 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान आज पोलंडहून दिल्लीत दाखल झाले आहे. ऑपरेश गंगा अंतर्गंत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणले जात आहे.
#RussiaUkraineConflict | A special flight, carrying 242 Indian citizens who were stranded in #Ukraine, arrives in Delhi from Poland#OperationGanga pic.twitter.com/WD9IEdFHVl
— ANI (@ANI) March 11, 2022
युक्रेनमधील युद्धामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकाची मदत करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकता आवश्यक आहे. असं संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे.
War in Ukraine calls for international cooperation & solidarity to support everyone affected, and to overcome clear violation of international law: UN Secretary-General António Guterres at UNGA pic.twitter.com/uQdUuAhGGS
— ANI (@ANI) March 10, 2022
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर फेसबुकने रशियाविरोधातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र दुसरीकडे रशियन आक्रमणकर्त्यांविरुद्ध हिंसक भाषणाला परवानगी देण्यासाठी, फेसबुकने आपल्या नियमांमध्ये काही बदल केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.
Facebook eases rules to allow violent speech against ‘Russian invaders’, reports AFP News Agency pic.twitter.com/uFetmWf8mb
— ANI (@ANI) March 10, 2022