Russia Ukraine War Live : युक्रेनमधील भारतीय दूतावास पोलंडमध्ये हलविणार; भारत सरकारचा निर्णय

| Updated on: Mar 14, 2022 | 12:07 AM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : युक्रेनमधील भारतीय दूतावास पोलंडमध्ये हलविणार; भारत सरकारचा निर्णय
Follow us on

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा अठरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये करण्यात येत असलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक मोठी शहरं ओस पडली आहेत. युद्धाच्या भीतीपोटी बारा लाखांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. अनेक युक्रेनियन नागरिक शेजारच्या पोलंडच्या आश्रयाला गेले आहेत. या युद्धात जीवित आणि वित्तीहानी देखील मोठ्याप्रमाणात झाली आहे. दरम्यान या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीयन राष्ट्रांचा युक्रेनला पाठिंबा मिळताना दिसत आहे. आम्ही युद्धात प्रत्यक्ष भाग घेणार नाही, मात्र युक्रेनला सहकार्य करत राहू अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेकडून युक्रेनला  संरक्षणासाठी शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी फंडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र युक्रेनने आत्मसमर्पण करावे अशी मागणी रशियाच्या पारराष्ट्र मंत्र्यांनी केली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Mar 2022 11:20 PM (IST)

    युक्रेनमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची बस उलटली; एक ठार

    युक्रेनियन सीमा ओलांडून पोलंडमध्ये गेलेले नागरिक आता थेट थेट इटलीला जाण्यासाठी रांगा लावत आहेत, अशीच एक बस 50  युक्रेनियन नागरिकांना घेऊन जाणारी बस उलटून अपघात झाला. यामध्ये एक ठार झाला आहे.

     

  • 13 Mar 2022 09:44 PM (IST)

    युक्रेनकडूनच विदेशी नागरिकांची हत्या;रशियाचा आरोप

    रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात विदेशी नागरिकांना युक्रेनकडूनच मारण्याता आल्याचा रशियाचा आरोप.


  • 13 Mar 2022 09:20 PM (IST)

    तुर्की आणि ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सामंजस्यपणावर चर्चा

    रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी रविवारी इस्तंबूल येथे चर्चा केली, शेजारील नाटो सदस्यांमध्ये सामंजस्यपणावर चर्चा करण्यात आली.

  • 13 Mar 2022 08:45 PM (IST)

    युक्रेनच्या मारियुपोलमधील 2,100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

    रशियाकडून युक्रेनवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 2,100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात मृत्यूमखी पडलेले नागरिक हे मारियुपोल येथील रहिवासी असल्याचे तेथील लोकप्रतिनिधींनी सांगितले.

  • 13 Mar 2022 08:37 PM (IST)

    युक्रेनमधून 2.7 दशलक्ष नागरिकांचे पलायन

    रशियाकडून युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधून पलायन करणाऱ्या निर्वासितांची संख्या  2.7 दशलक्ष झाली आहे. निर्वासित होणाऱ्या नागरिकांचा हा आकडा रविवारी संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला आहे.

     

  • 13 Mar 2022 08:28 PM (IST)

    युक्रेनमधील ‘संहार’ थांबला पाहिजे; पोप फ्रान्सिस यांचे मत

    रशियाकडून होत असलेले हल्ल्यांमुळे होणारा संहार थांबला पाहिजे असे मत पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले आहे. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये हजारों लोकांसमोर बोलताना त्यांनी रशियाचा जाहीर निषेध व्यक्त केला.

  • 13 Mar 2022 07:47 PM (IST)

    रशियन सैन्यांकडून अमेरिकन पत्रकाराची हत्या

    युक्रेनची राजधानी कीवमधील वायव्य उपनगरातील इरपिनमध्ये रविवारी एका अमेरिकन पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर दुसरा एक जण जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनियन सैन्य अधिकार्‍यांनी या गोळीबारासाठी रशियन सैनिकांना दोषी ठरवले आहे. एएफपी वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले की, या परिसरात सतत गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत आहे.

  • 13 Mar 2022 07:21 PM (IST)

    युक्रेनमध्ये अमेरिकन पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

    युक्रेनमध्ये अमेरिकन पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पत्रकाराला गोळ्या झाडल्याची घटना एका डॉक्टरसमोर घडली आहे असे एएफपी न्यूज एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.

  • 13 Mar 2022 06:54 PM (IST)

    युक्रेनमध्ये असणारे नायजेरियातील 300 नागरिक मायदेशी परतले

    रशिया युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे इतर देशातून युक्रेनमध्ये गेलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अठराव्या दिवशीही रशियाकडू हल्ले सुरुच असून त्या हल्ल्यात प्रचंड मोठी जीवितहानी झाली आहे. रविवारी ईशान्य युक्रेनमधील नायजेरियातील 300 नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती नायजेरियन सरकारने सांगितले.

  • 13 Mar 2022 06:16 PM (IST)

    युक्रेनमधील भारतीय दूतावास पोलंडमध्ये हलविणार; भारत सरकारचा निर्णय

    रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता 18 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत आहे. या युद्धात दोन्ही देशांमधील एकही देश माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून युक्रेनच्या पश्चिम भागातील भारतीय दूतावास तात्पुरत्या काळासाठी रशियातून पोलंडमध्ये हलवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

  • 13 Mar 2022 04:58 PM (IST)

    युक्रेनमधील पश्चिम लष्करी तळावर हल्ला; 35 नागरिकांचा मृत्यू

    युक्रेनमधील पश्चिम लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 35 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती युक्रेनच्या ल्विव्ह प्रदेशाचे गव्हर्नर सांगितले आहे.

  • 13 Mar 2022 04:07 PM (IST)

    रशियन सैन्यांकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर हल्ले सुरूच

    रशियन सैन्याने शनिवारी रात्री युक्रेनमधील मारियुपोलवर क्षेपणास्त्रांचा जोरदार हल्ला केला, या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी युक्रेनची राजधानी कीव जवळच्या अनेक शहरांवरही रशियन सैनिकांकडून हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात मारियुपोलमधील 1,500 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. गोळीबार सुरु असल्यामुळे मृत नागरिकांवर दफन करताना व्यत्यय येत आहे.

  • 13 Mar 2022 10:12 AM (IST)

    खेरसन प्रातांवर रशियाचा ताबा

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठरावा दिवस आहे. याचदरम्यान आज रशियन सैनिकांनी युक्रेनमधल्या खेरसन प्रातांचा ताबा घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 13 Mar 2022 08:34 AM (IST)

    मेलिटोपोलच्या महापौरांच्या सुटकेसाठी युक्रेनला इस्रायलची मदत

    मेलिटोपोलच्या महापौरांचे रशियाने अपहरण केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. मेलिटोपोलच्या महापौरांच्या सुटकेसाठी मदत करावी असे आवाहन युक्रेनने इस्रायल आणि जर्मनिला केले होते. दरम्यान आता महापौरांच्या सुटकेसाठी इस्रायल युक्रेनला मदत करणार असल्याचे समोर येत आहे.

     

  • 13 Mar 2022 07:55 AM (IST)

    अमेरिकेकडून युक्रेनला शस्रे खरेदीसाठी 200 अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत

    रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून युक्रेनला मदत करण्यात येत आहे. आता अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रे खरेदीसाठी 200 अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत करण्यात येणार आहे.

     

  • 13 Mar 2022 06:29 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 13,000 परदेशी नागरिकांचे शनिवारी युक्रेनमधून स्थलांतर

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 13,000 परदेशी नागरिकांचे शनिवारी युक्रेनमधून स्थलांतर युक्रेनच्या उपपंतप्रधानांची माहिती