रशियाने युक्रेन (Russia-Ukraine) मधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे, आत्तापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे तिथली परिस्थीती अत्यंत वाईट असल्याचे आपण व्हिडीओ (Russia-Ukraine Crisis video) पाहतोय. सध्या दोन्ही देशांमध्ये वारंवार हल्ले सुरू असून त्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युक्रेनमधील भीतीच्या सावटाखाली आहेत. रशियाने युक्रेनविरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचे दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा (Oksana Markarova) यांनी केला आहे. तसेच यामुळे शक्तीशाली स्फोट घडवण्यासाठी परिसरातील ऑक्सीजन शोषून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा बंदी असल्याचे देखील क्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी म्हणटले आहे. त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट असून दुस-या देशातील तिथं वास्तव करीत असलेली अनेक लोक तिथं अडकली आहेत. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.
थर्मोबॅरिक बॉम्ब अत्यंत घातकं शस्त्र
थर्मोबॅरिक बॉम्बची तुलना जगात अत्यंत घातकं शस्त्र म्हणून केली जाते. 2007 साली थर्मोबॅरिक बॉम्ब तयार करण्यात आला होता. त्या बॉम्बचं वजन साधारण 7100 किलो असतं. त्याचा वापर केल्याने युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचा वापर रशियाना रस्त्यात येणा-या बिल्डींग आणि लोकांना मारण्यासाठी केला आहे. त्याला एअरोसॉल नावाने ओळखला जातो. पोर्ट्समाऊथ युनिवर्सिटीतील पीटर यांनी, रशियाने यांच्या आगोदर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर सिरीयाच्या विरोधात 2016 ला केला होता. हा एकदम खतरनाक बॉम्ब असून त्यांची 44 टनची ताकद असून तो खूप मोठं नुकसान करू शकतो.
व्हॅक्यूम बॉम्ब ऑक्सिजन शोषून घेतो
व्हॅक्यूम बॉम्बचे एक महत्त्वाची बाब म्हणजे तो ऑक्सिजन शोषून घेतो आणि मोठा स्फोट करतो. अशा स्फोटांमुळे, अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह त्यातून बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात. त्यामुळे जगात अशा शस्त्रांना अधिक भयानक मानलं जातं. त्यामुळे त्याच्या वापरावरती जगात बंदी आहे. हा बॉम्ब रशियाने तयार केला असून तसेच एखाद्या देशाने त्याच्या विरोधात युद्ध करताना विचार करावा यासाठी तो बॉम्ब त्यांनी तयार केला आहे. हा बॉम्ब तयार करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे, हा बॉम्ब अमेरिकेने 2003 साली तयार करण्यात आला होता.