Marathi News International Russia Ukraine war Crisis Russia starts military operation in Ukraine; explosions heard in Kyiv Kharkiv know top 7 updates
Russia Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती आणखी वाढली!
युक्रेनवर मिसाईन्सनं हल्ला करण्यात आला आहे. किव, खारकीवसह चार शहरांवर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्यानं परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. त्यात पार्श्वभूमीवर जाणून घ्या सात मोठ्या अपडेट्स
रशियाचा युक्रेनवर मियाईल हल्ला
Follow us on
रशिया आणि युक्रेन यांच्या संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला या दोन दिशांमधील मुद्दा आता युद्धाचे ढग अधिक गडद करतो आहे. गुरुवारी वेगवेगळ्या जागतिक वृत्तसंस्थांनी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला असल्याचं म्हटलंय. रशियाचे राष्ट्रपती वाल्मादिर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे अधिकच आक्रमक झालेत. युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेलेत. मात्र युक्रेनला पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो (NETO) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं वाद चिघळू लागला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी जागतिक स्तरावर युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर घडत असून ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.
युद्धासारखी स्थिती!
युक्रेनच्या अनेक शहरांत स्फोट झाला असल्याचं वृत्त हाती येत आहे. ओडेसा या ठिकाणी दोन महाशक्तिशाली स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. तर युक्रेनची राजधानी किवमध्येही दोन स्फोट झाले आहे. सीएनएननं याबाबतचं वृत्त दिलंय. क्रामटोरस्क, बर्डियास्क आणि निकोलन शहरांत स्फोट झाले असल्याचं सांगितलं जातंय.
युक्रेनवर मिसाईन्सनं हल्ला करण्यात आला आहे. किव, खारकीवसह चार शहरांवर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्यानं परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्मादिर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्याननंतर आता युक्रेनमध्ये मिलिट्री ऑपरेशन्स सुरु करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दुसरीकडे पुतिन यांनी युक्रेन सैन्याला शरण येण्याचं आवाहन केलंय.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांनी वाल्मादिर पुतिन यांना युद्धाची भूमिका मागे घेण्यातं आवाहन केलंय. आपल्या सैनिकांना मिलिट्री ऑपरेशन्स करण्यापासून रोखण्याचं आव्हान यूएनकडून करण्यात आलं आहे. आपल्या सैनिकांना थांबवा आणि शांती प्रस्थापित करा, असं यूएनच्या महासचिवांनी म्हटलंय.
रशियाला अमेरिकेनंही चेतावणी दिली आहे. युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं अमेरिकेनं म्हटलंय. युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं युक्रेनची बाजू घेत रशियावर काही निर्बंध घातले होते. हे निर्बंध हा एक इशारा असल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं.
चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गुरुवारपासून 30 दिवसांची आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. वाल्मादिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेता युक्रेननं आणिबाणी घोषित केली आहे.
युक्रेनमधील अनेक देशांच्या दूतावासातील नागरिकांनाही आपआपल्या देशात परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मॉस्को ने आपल्या युक्रेनमधील नागरिकांना आणि दूतावास यांना बाहेर काढलंय. पश्चिमेतल्या अनेक देशांनी आता रशियाविरोधात प्रतिबंध लागू करण्यात सुरु केली आहे.