Russia-Ukraine War: चूल विझली , भिंत खचली, होतं नव्हतं ते सगळं गेलं.. युद्धात संसाराची राखरांगोळी झाली युक्रेन नागरिक भावूक
या युद्धामुळे विस्थापित झालेले लोकं पुन्हा आपल्या घराकडे परतत आहेत. मात्र तिथे केवळ घराच्या, विध्वंसाचे सांगाडे उभे राहिलेले दिसून येत आहे. घरांची, परिसराची झालेली नासाडी पाहून नागरिकांना अश्रू अनावर झालेत.
1 / 6
रशिया - युक्रेनच्या युद्धात मोठ्याप्रमाणात जीवात हानी झाली आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनमधल्या ४०० हून अधिक ठिकाणी रशियाने हल्ला करून विध्वंस केला असल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे.
2 / 6
युक्रेनमधील अनेक युद्धग्रस्त भागात इमारतीचे केवळ भीषण सांगाडे उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी पीडित नागरिक घराची साफसफाई करताना दिसून आले आहे.
3 / 6
भारत आणि फ्रान्सने नुकतेच रशियाला युक्रेनमधील "तात्काळ शत्रुत्व थांबविण्याचे" आवाहन केले. पॅरिसमध्ये संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांनी मानवतावादी संकट आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
4 / 6
या युद्धामुळे विस्थापित झालेले लोकं पुन्हा आपल्या घराकडे परत आहेत. मात्र तिथे केवळ घराच्या, विध्वंसाचे सांगाडे उभे राहिलेले दिसून येत आहे. घरांची, परिसराची झालेली नासाडी पाहून नागरिकांना अश्रू अनावर झाले
5 / 6
युद्धात हानी झालेल्या परिसराची व घरांची स्थिती पाहून नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या युद्धात मोठा प्रमाणात नागरिक विस्थापित झाले आहेत. तर अनेक कुटूंबे मृत्युमुखी पडली आहेत.
6 / 6
रशिया-युक्रेन युद्धात कोणताही एक देश विजयी होणार नाही. या युद्धामुळे सर्वांनाच त्रास होईल. या युद्धाचा विकसनशील आणि गरीब देशांवर "अधिक गंभीर" परिणाम होईल. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.