नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाचा (Russia Ukraine War) आज 12 वा दिवस आहे. रशिया-यूक्रेनमधील संघर्षाचा भारतावर थेट परिणाम पाहायला मिळतोय. हजारो भारतीय नागरिक आणि वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी (Indian Students) यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरुपपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) हाती घेतलं आहे. या अभियानात वायूदलाच्या विमानांद्वारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणलं जात आहे. मात्र, एका भारतीय डॉक्टरने भारतात परत येण्यास नकार दिलाय. त्यासाठी त्यांनी एक महत्वाचं कारणही दिलंय.
जग्वार कुमार या नावानं प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर गिरीकुमार पाटील यांनी एक बिबट्या आणि एक ब्लॅक पँथर पाळलेला आहे. या प्राण्यांसह त्यांना भारतात यायचं आहे. मात्र, भारतीय दूतावासाकडून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. बिबट्या आणि ब्लॅक पँथरशिवाय मी यूक्रेन सोडणार नाही, असं पाटील यांनी म्हटलंय. ‘मी अनेकदा भारतीय दूतावासाला संपर्क साधला. पण त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. मी असलेल्या संपूर्ण परिसरात रशियन सैन्याचा वावर आहे. मात्र, मी मला शक्य ते सर्व प्रयत्न करतोय. मी त्यांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळलं आहे, असं गिरीकुमार पाटील यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
Donbas | An Indian doctor Girikumar Patil famously known as Jaguar Kumar refuses to leave Ukraine without his pet jaguar & panther
“I called Embassy but didn’t get a proper response. My place is surrounded by Russians but I’m trying my best. I treat them like my kids,” he says pic.twitter.com/Ou5bT4bsN3
— ANI (@ANI) March 7, 2022
रशिया यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत जवळपास 35 मिनिटे फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर मोदी आणि पुतिन यांच्यातही जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती एएनआयने दिलीय.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना थेट यूक्रेनसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला. मोदींनी पुतिन यांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरु असलेल्या वाटाघाटीसोबतच थेट झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
PM Modi spoke on the phone to Russian President Putin. The phone call lasted for about 50 min. They discussed the evolving situation in Ukraine. President Putin briefed PM Modi on the status of negotiations between the Ukrainian and Russian teams: GoI Sources
(File pics) pic.twitter.com/KCGv8Sz894
— ANI (@ANI) March 7, 2022
इतर बातम्या :