Russia Ukraine War : युक्रेनमध्ये (Ukraine) आतापर्यंत दोन भारतीयांचा मृत्यू (Indian Students Death in Ukraine) झाला आहे. त्यातल्या एकाचा रशियाच्या गोळीबारात तर एकाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आता युक्रेनमधून एक असा व्हिडिओ (Indian Student Video) समोर आला आहे तो पाहून कुणाचेही काळीज करपेल. कारण गोळ्या लागलेला एक भारतीय विद्यार्थी या व्हिडिओत रुग्णालयातून भारत सरकारला मदतीची याचना करताना दिसून येतोय. यातून त्यानं त्याच्यावर हल्ला कसा झाला हेही सांगितलं आहे. मी रेल्वे स्टेशनला गेलो. पण ट्रेनचे तिकीट मिळेना, मग टॅक्सी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी टॅक्सीवाल्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. एक हजार डॉलर देऊन टॅक्सी घेतली. आम्ही तीन जणांनी टॅक्सी शेअर केली. मात्र तीन चेकपोस्ट पार केल्यानंतर आम्हाला परत पाठवण्यात आले. आम्हाला उद्या ट्रॅव्हल करा असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही क्यीव शहरात परत आलो. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. अशी कैफीयत या भारतीय तरूणाने सांगितली आहे.
मायबाप सरकार हे ऐका
#WATCH “No support from the Indian embassy yet. I have been trying to get in touch with them, every day they say we will do something but no help yet,” says Harjot Singh, an Indian who sustained multiple bullet injuries in war-torn Ukraine, receiving treatment at a Kyiv hospital pic.twitter.com/8oc9urO74s
— ANI (@ANI) March 4, 2022
गोळीबार कसा झाला?
क्यीवमध्ये परतल्यावर गोळीबार वाढला. तीन चार लोक जमिनीवरून आणि तीन चार लोक बिल्डिंगवरून फायरिंग करत होते. मी जमिनीवर बसलो. मला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी माझ्या छातीत लागली. त्यावेळी मी बेशुद्ध झालो. त्यानंतर मी डायरेक्ट रुग्णालयात होतो. दोन तारखेला मी शुद्धीवर आलो. त्यानंतर डॉक्टरांनी मला घटनाक्रम सांगितला. तीन चार तास मी रस्त्यावर पडून होतो. खूप रक्त सांडले होते. डॉक्टरांनी गोळ्या काढून प्लास्टर केले आहे. मात्र जखमा दुखत आहेत. अशी व्यथा या तरूणाने मांडली आहे.
मदतीसाठी सरकारकडे याचना
मी दिल्लीचा राहणारा आहे. शुद्धीवर आल्यानंतर पहिला फोन मी आईला केला. सर्व परिवाराशी बोलणं झालं. मला नवं आयुष्य मिळालं आहे. मी भारतात जाऊ इच्छितो. मी भारताच्या दुतावासाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आधीच स्थलांतरीत झाले आहेत. दिल्लीत फोन केला तर मदत करू बोलत आहेत, मात्र अजूनही मदत आली नाही. अॅम्बेसीशीही कॉन्टक्ट होईल. तुमच्या माध्यमातून मला बाहेर काढण्याचे आवाहन करतो. मला कसेही बॉर्डर क्रॉस करून द्या. इश्वराने जीवन दिलं आहे तर मला जगायचे आहे. इथे मी आयटी शिकण्यासाठी आलो आहे. आता मी आधी भाषा शिकत होते. मी क्ली क्लिनिकल हॉस्पिटल मध्ये आहे. मला मदत करा. अशा याचना करताना हा तरुण दिसून आला.
युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, कीवमधील ऑईल डेपोलाही केलं लक्ष्य, युद्धाचे ढग गडद
पाकिस्तानमधील मशिदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?
Russia Ukraine War : पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ