नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) झळा सध्या जग सोसतंय. सोशल मीडियावरही सगळीकडे युद्धाचे व्हिडिओ आणि आक्रोश दिसतोय. अशात दोन्ही देशातील नेत्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडूनही सोशल मीडियावर अनेक आवाहनं करण्यात येत आहेत. तर भारतीयांसह इतर देशातील लोक युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मदत मागत आहेत. या युद्धात सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर झालाय. रशियाने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून कोंडी आणि दबाव तंत्राचा उपयोग करण्यात येतोय. अशातच एक बातमी समोर आलीय, सोशल मीडिया, फेसबूक आणि जो बायडेन-ब्लादिमीर पुतील यांच्या संबंधीची. या युद्धाच्या तणावामुळे अमेरिका आणि रशियात सध्या टेन्शनचा माहोल आहे. त्यामुळे जो बायडेन (Jo Biden) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांना फेसबुकवर अनफ्रेंड केल्यााची बातमी सध्या सोशल मीडियावर फिरतेय.
अनफ्रेंड प्रकरणाची चर्चा
युद्धामुळे जो बायडेन आणि पुतीन यांच्यात सध्या विस्तवर जात नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहे. अशातच बायडेन यांनी पतीन यांना अनफ्रेंड केल्याच्या बातमीचाही चांगलाच बोलबाला सुरू आहे. अमेरिकन सिनेटरने केलेल्या एका वक्तव्यामुळेही दोन्ही देशात संबंध ताणले गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कोणीतरी हत्या करावी, असे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम (Lindsey Graham) यांनी म्हटले आहे. लिंडसे ग्रॅहम हे एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले की, पुतीनला मारण्यासाठी रशियात कोणीतरी पुढे यावे. तरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. अमेरिकन सिनेटरच्या या वक्तव्यावर रशिया चांगलाच संतापला असून या प्रकरणावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रशियाने हल्ले वाढवले
रशियन सैनिकांनी आज युक्रेनमध्ये असलेला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झियाच्या परिसरात तुफान गोळीबार केला होता. त्यानंतर आता रशियन सैनिकांनी झापोरिझ्झिया प्रकल्प ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. रशियन सैनिकांनी अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या नऊ दिवसांपासून हे घमासान युद्ध दोन्ही देशात सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही देशात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र यातून अद्याप तोडगा निघाला नाही.
Indians In Ukraine : गोळी लागलेल्या जखमी भारतीय तरुणाचा व्हिडिओ, मदतीची याचना ऐका मायबाप सरकार
युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, कीवमधील ऑईल डेपोलाही केलं लक्ष्य, युद्धाचे ढग गडद
पाकिस्तानमधील मशिदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?