रशिया (russia) आणि युक्रेनच्या (ukraine) युद्ध (war) आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने तिथली परिस्थिती देखील अगदी भयदायक आहे. सध्याचं युद्ध पाहून अनेकांना अनेकांना 1945 च्या दुस-या महायुद्धाची आठवण झाली असणार कारण सध्याच्या युद्धात देखील बॉम्ब हल्ला सुरू आहे. अचानक एखादा मोठा स्फोट झाला, मोठा आवाज तुमच्या कंठाळ्या अनेकांचा मृत्यू झाला. जखमीच्या आवाजाला सुरूवात झाली असं झालं होतं. 1945 मध्ये दुस-या महायुध्दात त्यावेळी अमेरिकेने जपान मधल्या हिरोशिमा आणि नागासकी शहरावरती हल्ला केला होता. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण कायमचे जखमी झाल्याचे पाहायला मिळत होते. तिथला बॉम्ब हल्ला इतका भयानक होता की, कित्येकवर्ष लोक मरत होती.
दुसरा कोणता देश युद्धात उतरल्यास त्याचं काही खरं नाही
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आण्विक दलाचा वापर झाल्यास किती भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा आपण विचार केलेला बरा, कारण 1945 साली आण्विक युद्धाचे तिथं आजही पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याचं युद्ध हे एका निर्णायक मोडवरती असल्याने काहीही होऊ शकते अशी परिस्थिती आहे. परंतु तिथली धोका अद्याप ठळलेला नाही. अमेरिकेसोबत अनेक देश युक्रेनची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पहिल्यांदाचा इशारा दिला आहे की, एखाद्या बाहेरच्या देशाच्या आमच्या युध्दात उतरला, तर त्याला खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच त्यांनी आण्विक युद्धाची धमकी देखील दिली असल्याची माहिती मिळत आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अनेक शेजारील देश चिंतेत आहेत. कारण या युद्धाचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहेत.
आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?