Russia Ukraine War Photo: भारतीय पोरांची भूतदया, युद्धभूमीत त्यांनी ‘टिप्या, स्वीटु’लाही सोबत आणलं
महेश घोलप |
Updated on: Mar 03, 2022 | 10:20 AM
युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांसोबत असलेल्या प्राण्यांना त्यांनी भारतात आणलं असल्याचं विमानतळावर पाहायला मिळाल आहे. त्याचबरोबर भारतात येईपर्यंत त्यांनी प्राण्याची काळजी सुध्दा घेतली आहे.
1 / 8
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान दिलं आहे.
2 / 8
रशियाने युक्रेनवरती ताबा मिळवल्यापासून अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचं काम भारत सरकार करीत आहे
3 / 8
युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत येताना त्यांच्या हातात मांजर आणि कुत्रा असे प्राणी दिसत आहे
4 / 8
युद्धजन्य परिस्थिती असताना देखील तिथून प्राणी घेऊन आल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे.
5 / 8
युक्रेनवरती हल्ला होत असताना भारतात येण्यासाठी जवळच्या देशात अनेकांनी आपली मांजर नेली, तसेच तिची भारतात येईपर्यंत काळजी घेतली असल्याचं एका विद्यार्थ्यांने सांगितले आहे.
6 / 8
एका विद्यार्थांने कुत्रासोबत आणला आहे, तो तिथं त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून होता असं तो म्हणाला आहे.
7 / 8
भारतातील साधारण 18,000 नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते, त्यापैकी अनेकांना भारतात आणण्यात यश भारत सरकारला यश आले आहे.
8 / 8
भारतात येणा-या विद्यार्थ्यांचं केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली विमानतळावरती स्वागत केलं आहे. विमानतळावर विद्यार्थ्यांना पाहून पालकांना आनंद झाला आहे.