नवी दिल्ली : रशियाच्या (Russia) विदेश मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine war) यांच्यातील ताणलेल्या संबंधांवरही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, युद्धाऐवजी शांततेनं प्रश्न सोडवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव गुरुवारी भारतात दाखल झाले होते. सर्गेई लावरोव हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. दिल्लीत त्यांना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली असल्याचं सांगितलं जातंय. यावेळी सर्गेई लावरोव यांनी युक्रेनमधील स्थितीबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. यावेळी शांततेच्या मार्गानं चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासह रशियाच्या विदेश मंत्र्यांनी भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली. भारत आणि रशियामधील संबंधांच्या दृष्टीनं ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.
During meet with Russian FM, PM Modi calls for cessation of violence in Ukraine
Read @ANI Story | https://t.co/TVpc8UieUK#PMModi #India #Russia #SergeiLavrov pic.twitter.com/v2rFAkWMyn
— ANI Digital (@ani_digital) April 1, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये झालेल्या हिंसेवरुन लक्ष वेधलं. युक्रेनमधील हिंसा तातडीनं थांबवली जावी आणि त्यासाठी रशियानं सकारात्मक दृष्ट्या चर्चेचा मार्ग अवलंबवावा, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं आहे. रशियाच्या विदेश मंत्र्यांनी यावेळी मोदींनी भारत-रशिया शिखर संमेलनात घेतल्या गेलेल्या निर्णय किती प्रगतीपथावर आहेत, याचीही माहिती या भेटीदरम्यान दिली.
मॉक्सो आणि कीव यांच्या दरम्यान मध्यस्थी करण्याच्या शक्यतेवर बोलताा रशियाच्या विदेश मंत्र्यांनी म्हटलंय की, भारत एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारतानं पुढाकार घेतलं, तर कदाचित प्रश्न सुटूही शकतो. रशिया आणि भारतातील संबंध आता आणखी घट्ट होणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील ताणलेल्या संबंधादरम्यान रशियाच्या विदेश मंत्र्यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय. 2000 साली झालेल्या भारत आणि रशियातील करारानंतर या दोन्ही देशांतील संबंध चांगले झाले आहे. राजकीय, संरक्षण, व्यापार या सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांनी एकमेकांच्या मदतीनं उल्लेखनीय यश संपादन केल्याचंही लावरोन यांनी म्हटलं आहे.
Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा
अविश्वास ठरावाबद्दल इमरान खान म्हणतात, शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार; पण राजीनामा देणार नाही