मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) तेरा दिवसांनंतरही थांबायचे नाव घेत नाहीये. आता तर अमेरिकेने रशियाच्या बाबतीत कठोर पाऊलं उचलल्याने रशिया आणखी भडकण्याची शक्याता आहे. रशिया आणि युरोपचेही संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. अशात युद्धातल्या थराराचे काही व्हिडिओ (surgical strike video) समोर आले आहेत. आतापर्यंत रशियाने यु्क्रेनवर अनेक हल्ले चढवले आहेत. यात युक्रेनची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा पहिला व्हिडिओ जो समोर आला आहे. तो रशियाने युक्रेनवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा (War Video) असल्याचे सांगण्यात येत आहे. यात रशियन हेलिकॉर्टरने उड्डाण घेतल्यापासून ते जाऊन टार्गेवर निशाणा साधून परत येईपर्यंत सर्व सविस्तर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे युद्दाच्या थराराचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ
रशियाने युक्रेनवर स्ट्राईक केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल…उड्डापासून ते टार्गेटपर्यंत सर्व काही…. pic.twitter.com/tXAtLQemSa
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2022
तरुणांना युक्रेनने युद्धात उतरवलं
हा दुसरा व्हिडिओ जो समोर आला आहे, यात युक्रेनने तरुणांना युद्धाच्या मैदानात उतरवले आहे. त्यांना ट्रेनिंग देतानाचा युक्रेनियन सैनिकांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशा जिगरबाज सैनिकांमुळेच रशिया अजूनही युक्रेन जिंकू शकलेला नाही.
ट्रेनिंगचा व्हिडिओ चर्चेत
युक्रेनने मोठी सैन्यभरती काढली…तरूणांना उतरवले युद्धाच्या मैदानात…पाहा ट्रनिंगचा थरार pic.twitter.com/4OKtLJx7Gz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2022
अमेरिकेने कठोर पाऊलं उचललं
अमेरिका (Us) रशियाकडून आयात होणाऱ्या गॅस, तेल आणि उर्जेवर बंदी घालत आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील बहुतेक देश रशियावर कडक निर्बंध घालत आहेत. अमेरिकेनेही याआधी तसा इशारा दिला होता. रशिया-युक्रेन वाद दिवसागणिक चिघळत चालला आहे. आगामी काळात नव्या समस्यांना तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी उचललेल्या पावलांवर रशियानं अख्खा जगालाच गर्भित इशारा दिला आहे. रशियाच्या उर्जा पुरवठ्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिमीय राष्ट्रांना 300 डॉलर प्रति बॅरेल भावाने कच्चे तेल खरेदी करावे लागेल असे इशारा रशियानं दिला आहे. मात्र तेल आयतीवर अमेरिकेने बंदी घालून रशियाला पहिला चेकमेट देत कोंडी केली आहे.
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?
Russia Ukraine war : अमेरिकेने रशियाकडून तेल आयातीवर बंदी घातली, राष्ट्राध्यक्ष बायडेन काय म्हणाले?
Video : युद्धाच्या भूमित प्रेमाचं गुलाब फुललं, रशियापुढे नाही पण तिच्यापुढे त्याने आपसूक गुडखे टेकले