नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाबाबत (Russia Ukraine War) एक चिंताजनक बातमी आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने (Russia Defense Ministry) जाहीर केलंय की, रशियाविरोधात माहिती दडपण्याच्या कारणामुळे कीवमध्ये 72व्या ‘मेन सेंटर ऑफ इन्फोर्मेशन सायकोलॉजिकल ऑपरेशन’ आणि यूक्रेनच्या सुरक्षा सेवा सुविधेवर हल्ला करणार आहे. या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्याची सूचना रशियाने केलीय. रशियाने (Russia) मंगळवारीही यूक्रेनमधील अनेक देशांवर बॉम्बवर्षाव सुरुच ठेवलाय. रशियन सैन्याने यूक्रेनमधील सर्वात मोठं शहर खार्किवच्या सेंटरवर हल्ला केलाय. या हल्ल्यामुळं सोव्हियत काळातील प्रादेशिक प्रशासन इमारतीचं मोठं नुकसान झालंय.
घटनास्थळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 6 मृतदेह मिळाले आहेत. खार्किव विभाग प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव यांनी सांगितलं की रशियाने खार्किवच्या मध्यभागी असलेल्या रहिवासी इमारतीसोबत प्रशासकीय इमारतीवर मंगळवारी गोळीबार केला. यापूर्वी सोमवारी झालेल्या गोळीबारात कमीत कमी 11 लोकांचा मृत्यू झाला होता तर असंख्य लोक जखमी झाले होते. यूक्रेनचे सैन्य 14 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात घुसण्यापासून रशियन सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सिनेहुबोव यांनी सांगितलं.
Russian forces have attacked a television tower in Ukraine’s capital Kyiv, potentially disrupting its signal, Ukrainian Interior Ministry adviser Anton Herashchenko says: Reuters #RussianUkrainianCrisis
— ANI (@ANI) March 1, 2022
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदिमीर जेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने खार्किव शहरातील एका सेंट्रल स्क्वेअरवर मिसाईल हल्ला केलाय. हा एक निर्विवाद दहशतवाद असल्याचं म्हटलंय. तसंच जेलेन्स्की म्हणाले की, कुणीही माफ करणार नाही, कुणी विसरणार नाही. दरम्यान, सध्या रशियन सैन्य आणि यूक्रेनच्या सैन्यात खार्किव शहरात जोरदार लढाई सुरु आहे. हे शहर रशियाच्या सीमेपासून 40 किमी दुर आहे. अशावेळी या शहरावर रशियन सैन्य हल्ला करणार हे सुरुवातीपासूनच सांगितलं जात होतं.
यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली.
#WATCH | Ukraine President Volodymyr Zelenskyy received thunderous applause after concluding his remarks at EU meeting, said, “We are also fighting to be equal members of Europe. Without EU Ukraine is going to be lonesome. Do prove that you are with us & will not let us go.” pic.twitter.com/49WtnQT6MP
— ANI (@ANI) March 1, 2022
इतर बातम्या :