Russia Ukraine War : मेटरनिटी रुग्णालयावर रशियाचा तुफान गोळीबार, रुग्णालयाची ही अवस्था बघून काळजाचा थरकाप उडेल

| Updated on: Mar 11, 2022 | 10:12 PM

आता ट्विटरवर असे काही फोटो समोर आले आहेत ते पाहून काळजाचा थरकाप उडेल. कारम एका मेटरनिटी हॉस्पिटलवर (Kyiv Hospital Fire) झालेल्या गोळीबाराची दाहकता दाखवणारे हे फोटो आहेत.

Russia Ukraine War : मेटरनिटी रुग्णालयावर रशियाचा तुफान गोळीबार, रुग्णालयाची ही अवस्था बघून काळजाचा थरकाप उडेल
रशियचा रुग्णालयावर हल्ला
Image Credit source: AFP
Follow us on

गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या युक्रेच्या युद्धाचे (Russia Ukraine War) तुम्ही अनेक व्हिडिओ फोटो पाहिले असतील. मात्र आता ट्विटरवर असे काही फोटो समोर आले आहेत ते पाहून काळजाचा थरकाप उडेल. कारम एका मेटरनिटी हॉस्पिटलवर (Kyiv Hospital Fire) झालेल्या गोळीबाराची दाहकता दाखवणारे हे फोटो आहेत. जिथ लहान मुलांच्या खेळण्याचा रडण्याचा आवाज येतो. ते ठिकाण गोळीबाराच्या आवाजने सुन्न झाले आहे. युक्रेनियन आई कीवच्या एका उच्च प्रसूती रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर बरी होत होती, तेव्हाच रशियन सैन्याचा गोळीबार (Russia Attack on Ukraine) झाल्याने रुग्णालयाची त्या रुग्णालयाची दुरावस्था झालीय. रुग्णालयाच्या काचेला पडलेल्या छिद्रावरून त्याची दाहकता लक्षात येते. हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी तिला आणि इतर माता आणि बाळांना बाहेर काढण्यात आले. आणि हे रुग्णालय जखमी सैनिक आणि नागरिकांसाठी फ्रंटलाइन मदत केंद्र बनले. आता इथे सैनिकांचा इलाज होतेय.

रुग्णालय बनलं सैन्याचे हब

गुरुवारी दक्षिणेकडील शहरातील मारियुपोलमधील दुसर्‍या प्रसूती युनिटवर रशियन हल्ल्याने जग थक्क झाले आहे, व्हॅलेरी झुकिन हे मातृ आरोग्यातील जगप्रसिद्ध तज्ञ आणि उत्तर कीवच्या जंगली उपनगरातील खाजगी क्लिनिकचे सीईओ आहेत. त्यांच्या उपचाराची जगभरात ख्याती आहे. आता ते युद्धातील जखमींसाठी काम करत आहेत. जखमी युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांवर उपचार करत आहेत. लष्कराने रशियाला शरण जाऊ नये, यासाठी ते पुरेपूर मदत करत आहेत. रशियाच्या या रुग्णलयावरील हल्ल्यात काही प्रसुती झालेल्या माताही जखमी झाल्या असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

रुग्णालयाची दुरावस्था

हाकेच्या अंतरावर रशियन सैन्य

हा हल्ला झाल्यानंतर या ठिकाणाहून मतांना बाहेर काढण्यात आलंय. त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आलंय. क्लिनिकच्या आजूबाजूच्या जंगलात तोफखाना आणि गोळ्यांचा आवाज घुमतोय. त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. रशियन सैन्य या ठिकाणापासून केवळ सहा किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रशियन सैन्य ठिकाणी कब्जा करण्याची भितीही यांना लागली आहे. युद्धात जखमी नागरिकांना क्लिनिकमध्ये आणण्याचे काम युक्रेनच्या नागरी बचाव सेवेतील स्थानिक कमांडर वासिल ओक्साक यांच्याकडे आहे. गेल्या दोन आठवड्यापासून याच हिंमतीने युक्रेनने रशियाला थोपवले आहे.

रशियाचा निषेध न केल्याने बांग्लादेश फटका, लिथुआनियाकडून कोविड लसीची डिलिव्हरी रद्द

तुर्कीमध्ये शेजारी-शेजारी लावले रशिया-युक्रेनचे झेंडे, जाणून घ्या काय आहे कारण?

Chernobyl मध्ये वीजपुरवठा खंडित, झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन बंद; युक्रेनच्या अणु प्रकल्पातील परिस्थिती गंभीर!