Russia Ukrane War : युक्रेनच्या “भुतानं” रशियाला झपाटलं, रशियाच्या 6 फाइटर जेटचा केला भुगा

| Updated on: Mar 02, 2022 | 5:27 PM

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांचे सैनिक मारल्याचा दावा करत आहेत. यादरम्यान एक 'भूत' खूप (Ghost Of kyiv) चर्चेत आहे. लोक त्याला 'घोस्ट ऑफ कीव' म्हणत आहेत.

Russia Ukrane War : युक्रेनच्या भुतानं रशियाला झपाटलं, रशियाच्या 6 फाइटर जेटचा केला भुगा
युक्रेनच्या फाईटर पायलची चर्चा
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : युक्रेन (Ukraine) एक छोटासा देश असून मोठ्या शत्रुशी निर्भिडपणे लढतोय. अजूनही रशियाला युक्रेनला नमवण्यात यश आलेले नाही. त्याला कारण ठरलंय युक्रेनकधील जबरदस्त हत्यारं. युक्रेनकडे काही खास मिसाईल आहे. काही खास फाईटर जेट आहेत, ज्यामुळे त्यांनी रशियाला घायाळ केलंय. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांचे सैनिक मारल्याचा दावा करत आहेत. यादरम्यान एक ‘भूत’ खूप (Ghost Of kyiv) चर्चेत आहे. लोक त्याला ‘घोस्ट ऑफ कीव’ म्हणत आहेत. वास्तविक हे भूत दुसरे तिसरे कोणी नसून युक्रेनचे MiG-29 Fulcrum फायटर पायलट (Fighter Piolet) आहे. ज्यांना लोक देशाचा हिरो म्हणत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून, हा पायलट रशियन सैनिकांसाठी कर्नकाळ ठरला आहे. आतापर्यंत त्यांनी सहा लढाऊ विमाने पाडली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनचा एकटा पायलट कीवच्या आकाशात उड्डाण करत आहे आणि रशियाला सतत घायाळ करत आहे. या युद्धाच्या वातावरणात अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा स्थितीत या ‘कीवचे भूत’सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. पण सोशल मीडियावर लोक पायलटचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याचे खूप कौतुक करत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांव्यतिरिक्त पत्रकारांचाही सहभाग आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

असं आहे फायटर जेट

युक्रेनियन पत्रकार क्रिस्टोफर मिलर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी युक्रेनची दोन विमाने कीवच्या दिशेने जाताना आणि परत येताना पाहिली. त्यापैकी हा एक आहे. ही भूतं असू शकते का? भुतं आहेत का? सर्वांना जाणून घ्यायचे आहे.’ युक्रेन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘लोक त्याला कीवचे भूत म्हणतात. आणि अगदी बरोबर – हे UAF एकट्याने आपल्या राजधानीच्या आणि देशाच्या आकाशावर वर्चस्व गाजवले आहे. त्याचबरोबर रशियन विमानांवर हल्ला करून त्यांच्यासाठी एक भयानक स्वप्न बनले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. रशियन सैन्य आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात संघर्ष सुरू असताना, युक्रेनच्या नेत्यांनी रशियाशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. रशियन सैन्य आणि रणगाडे युक्रेनमध्ये घुसले आुहेत आणि राजधानीच्या आसपास पोहोचले आहेत. त्यामुळे राजधानी गमावण्याची भितीही युक्रेनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेन मोठ्या हिंमतीने लढा देत आहे. हा लढा सुरू राहण्याला युक्रेनच्या अशा भुतांचा मोठा हातभार लाभला आहे. रशियासाठीचे हे भूत युक्रेनसाठी हिरो ठरत आहे.

Russia Ukraine War : गुगलने रशियाच्या नाड्या आवळल्या, बंद केले हे सरकारी मीडिया अॅप

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Video: तिरंगा आहे तर सुरक्षा आहे, यूक्रेनमध्ये जेव्हा तुर्की, पाकिस्तान्यांनाही तिरंग्यानं वाचवलं !