मुंबई : गेल्या दोन आठवड्याहून युक्रेन विरुद्ध रशिया युद्ध (Russia Ukraine war) सुरू आहे. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शुक्रवारी रशियावर मेलिटोपोल शहराच्या महापौरांचे अपहरण केल्याचा आरोप केला, तसेच रशियाची तुलना “ISIS दहशतवाद्यांच्याशी (Terrorist) केली. त्यांनी दहशतवादाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे, ज्यामध्ये ते युक्रेनच्या स्थानिक प्रशासनाच्या प्रतिनिधींना छळत आहेत, त्यांना गायब करत आहेत. असा आरोप हाझेलेन्स्की यांनी शुक्रवारी संध्याकाळी एका व्हिडिओद्वारे केला. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख, किरिल टिमोशेन्को यांनी सोशल मीडिया साइट टेलिग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की व्हिडिओमध्ये सशस्त्र लोकांचे एक टोळकं महापौर इव्हान फेडोरोव्ह यांना चौरस्त्यावर घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. या किडनॅपिंगच्या आरोपाने आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. कारण आधीच युद्धाचा भडका आणि आता हे किडनॅपिंग प्रकरण हा संघर्ष आणकी वाढवत आहे.
महापौरांचा शोध सुरू
26 फेब्रुवारी रोजी, रशियन सैन्याने 1 लाग 50 हजार लोकसंख्या असलेल्या मेलिटोपोल या दक्षिणेकडील बंदर शहरावर कब्जा केला. पूर्व युक्रेनमधील बंडखोरांचा प्रदेश असलेल्या लुहान्स्क पीपल्स रिपब्लिकच्या कार्यालयाने आपल्या वेबसाइटवर सांगितले की फेडोरोव्ह यांच्या विरुद्ध फौजदारी खटला आहे. त्यांनी फेडोरोव्ह यांच्यावर दहशतवादी गटाशी संबंध असल्याचा आणि राईट विंग सैनिकांना डॉनबासच्या नागरिकांविरुद्ध दहशतवादी गुन्हे करण्यासाठी निधी देण्याचा आरोप केला. कार्यालयाने सांगितले की ते फेडोरोव्हला शोधत आहे आणि त्याच्या ठावठिकाणाबद्दल माहिती असलेल्या कोणालाही कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले.
24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू
24 फेब्रुवारीपासून या दोन देशांमधील युद्ध सुरू झाले. जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले. यानंतर रशियाने युक्रेनवर पहिला हल्ला केला. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 17 वा दिवस असून शांतता अजिबात दिसत नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्याही झाल्या. मात्र सर्व बैठका निष्फळ ठरल्या. यूएस काँग्रेसने युद्धग्रस्त युक्रेन आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांना 13.6 अब्ज डॉलरची लष्करी आणि आपत्कालीन मदत मंजूर केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर वीस लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पलायन करावे लागले आहे. सिनेटने गुरुवारी उशिरा एकूण 1.5 ट्रिलियन यूएस डॉलर्सच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
Video | युक्रेनकडून रशियन सैनिकांच्या वाहन ताफ्यावर हल्ला; अनेक वाहने उद्ध्वस्त; आग, धुूराचे लोट