सध्या जगभर चर्चा आहे ती फक्त आणि फक्त रशिया-युक्रेन युद्धाची (Russia Ukraine War). हे युद्ध थांबले पाहिजे असे सर्वांनाच वाटत आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी म्हटले आहे की त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे. पण ही चर्चा बेलारूसमध्ये (Belarus) होणार नाही. सुरू असलेल्या हल्ल्यासाठी बेलारूस ग्राउंड सपोर्ट करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी एका व्हिडिओ संदेशात वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, इस्तंबूल, बुडापेस्ट किंवा बाकू यांचे चर्चेची पर्यायी जागा म्हणून नाव दिले. ते म्हणाले की चर्चा इतर ठिकाणी देखील होऊ शकते, परंतु युक्रेन बेलारूसमध्ये चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रशिया आता आणकी कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. खरं तर, क्रेमलिनने रविवारी सांगितले की त्यांचे एक शिष्टमंडळ युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बेलारशियन शहर गोमेल येथे पोहोचले आहे.
रशियाचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार
यात क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की शिष्टमंडळात लष्करी अधिकारी समावेश आहे. ते म्हणाले, “रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत.” रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि त्यांचे सैन्य बेलारूसच्या दिशेने उत्तरेकडे सरकत आहे. रशिया आणि बेलारूस यांचे जवळचे संबंध आहेत. अशा परिस्थितीत या गोष्टीची आधीच भीती होती. त्याचवेळी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी युक्रेनच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की युक्रेनमध्ये बेलारशियन सैनिक नाहीत. याशिवाय येथे ना कुठली शस्त्रास्त्रे आहेत ना दारुगोळा. रशियाला अशा मदतीची गरज नाही. त्याचवेळी लुकाशेन्को यांनी युक्रेनला आपला देश गमावायचा नसेल तर त्यांनी वाटाघाटीच्या टेबलावर यावे, असे सांगितले आहे.
रशियाची भूमिका काय?
रशियाने म्हटले आहे की युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ बेलारशियन गोमेल शहरात पोहोचले आहे. शिष्टमंडळात लष्करी अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे. रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनियन अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत. विशेष म्हणजे रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि त्याचे सैन्य राजधानी कीवच्या जवळ पोहोचले आहे. याबाबत युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाचे सैनिक देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खारकीवमध्ये घुसले आहेत आणि रस्त्यांवर लढाई सुरू आहे. यात युक्रेनेचे मोठं नुकसान झाले आहे.
वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!
आता दोनच पर्याय; एक तिसरे महायुद्ध किंवा आर्थिक निर्बंध, बायडन रशियावर संतापले