नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आता यूरोपियन यूनियनचा (European Union) सदस्य बनणार आहे. यूक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरु झालीय. यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी यूक्रेननं केलेला अर्ज यूरोपियन संसदेनं (European Parliament) स्वीकारला आहे. दरम्यान, यूक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनचं मोठं नुकसान झालंय. रशियाकडून यूक्रेनच्या अनेक शहरांवर सातत्याने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. कीवसह देशातील प्रमुख शहरांना रशियन सैन्याकडून निशाणा बनवलं जात आहे. यूक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर खार्किववर रशियन सैन्य आणि यूक्रेनी सैन्यात जोरदार लढाई सुरु आहे.
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर हा अर्ज यूरोपियन यूनियनने फ्रान्सचे स्थायी प्रतिनिधी लेग्लिस-कोस्टा यांना सोपवलं. जेलेन्स्की यांनी यूक्रेनी संसदेचे प्रमुख वेरखोव्ना राडा आणि पंतप्रधान दिमित्रो श्मीगल सोबत संयुक्तरित्या हस्ताक्षर केलं. राष्ट्रपती जेलेन्स्की म्हणाले, मी यूक्रेनच्या यूरोपियन यूनियनच्या सदस्यता अर्जावर हस्ताक्षर केलं. सोमवारी झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनलाही संबोधित केले.
यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली.
Ukraine President Volodymyr Zelenskyy received a standing ovation after his address at European Parliament, said, “We’re fighting for our land & our freedom despite the fact that all our cities are now blocked. Nobody is going to break us, we’re strong, we’re Ukrainians.” he said pic.twitter.com/7JEU2Da9xd
— ANI (@ANI) March 1, 2022
इतकंच नाही तर जेलेन्स्की यांनी आपल्या संबोधनात आपला निर्धार स्पष्ट केला. ‘आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी! शहरं ब्लॉक असली तरी आम्हाला कुणीच तोडू शकत नाही, आम्ही कणखर आहोत! आम्ही युक्रेनियन्स आहोत!’, अशा शब्दात जेलेन्स्की यांनी यूक्रेन आपल्या मतांवर ठाम असल्याचं म्हटलंय. तसंच आमचे सैनिक मैदानात मजबुतीने टिकून आहेत. यूक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यूक्रेन आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय. आम्ही रशियासमोर गुडघे टेकणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.
#WATCH | Ukraine President Volodymyr Zelenskyy received thunderous applause after concluding his remarks at EU meeting, said, “We are also fighting to be equal members of Europe. Without EU Ukraine is going to be lonesome. Do prove that you are with us & will not let us go.” pic.twitter.com/49WtnQT6MP
— ANI (@ANI) March 1, 2022
इतर बातम्या :