नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) युद्धाने आता भीषण स्वरुप घेतलं आहे. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात मोठ्या जीवितहानीसह प्रचंड आर्थिक नुकसानही पाहायला मिळत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला हादरवणारी एक बहातमी आता समोर आलीय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला (Nuclear Deterrence Force) अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती. जर कुणी दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे हत्यार आहे. त्यामुळे रशियाचे मनसुबे स्पष्ट असून यूक्रेनसोबत सुरु असलेल्या त्यांचं युद्ध हे आण्विक युद्धात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.
यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर यात कुठलीही शंका नाही की ते दखल देतील आणि त्यांची हार होणार नाही. कोणताही देश आमच्यावर हल्ला करेल तर त्याला परिणान भोगावे लागतील, असा इशाराच पुतिन यांनी दिला होता. 1945 मधील दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा उपयोग केलेला नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. त्या हल्ल्यात 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Russian President Vladimir Putin has ordered his defence chiefs to put the country’s “deterrence forces” on high alert as he accused Western countries of taking “unfriendly” steps against his country amid Moscow’s invasion of Ukraine: AFP
— ANI (@ANI) February 27, 2022
यूक्रेनच्या मुद्द्यावर आपण कुठल्याही परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य पुतिन यांनी केलं आहे. पुतिन यांनी एकप्रकारे यूक्रेनला मदत करणाऱ्या कोणत्याही पश्चिमी देशांना आण्विक हल्ल्याचा इशाराच दिला आहे. शुक्रवारी NATO च्या 30 देशांनी चर्चा केली. असं असताना पुतिन यांनी कोणत्याही देशानं रशियाला निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला तर इतिहासात नोंद नसेल अशा परिणामांना सामोरं जावं लागेल असा निर्वाणीचा इशारा दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान मोदी युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरिय बैठक घेणार आहेत. रशिया आणि यूक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. तर यूक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाने यूक्रेनच्या 471 सैनिकांना अटक केल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर यूक्रेनमधील 975 सैन्य तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय.
इतर बातम्या :