रशियाने (russia) आत्तापर्यंत युक्रेनच्या (ukraine) अनेक शहरात हल्ला बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं आहे. रशियाकडून युक्रेनमधली प्रसुतीगृहासह पोलीस हेडक्वार्टर्सवरती हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं रशियाला काय साध्य करायचं आहे, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल. सध्या दोन्ही देश एका निर्णायक ठिकाणी पोहोचले असून पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरावरती बॉम्ब हल्ले करीत असल्याने तिथल्या इमारती पुर्णपणे खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे तिथले नागरिक इतके घाबरले आहेत. त्यांनी मदतीसाठी अनेक देशांना आवाहन केलं आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ला थांबावा त्यासाठी इतर देशांकडून देखील प्रयत्न सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या दोन देशांमधील युध्द पाहून अनेकांना 1945 साली झालेल्या युद्धाची (war) आठवण नक्की झाली असणार.
?Maternity home in Zhytomyr destroyed with ?? calibres.
If it’s not a genocide, what is that? pic.twitter.com/1zoMUywgf7
— MFA of Ukraine ?? (@MFA_Ukraine) March 2, 2022
रशियाच्या बाँब हल्ल्यात मजबूत इमारतीही जमीनदोस्त
रशियाने सुरूवातीला युक्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव मध्ये असलेल्या लष्करीसाठा नष्ठ करण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी तिथल्या सरकारी कार्यालये नष्ठ करण्याचं काम केलं. हे करीत असताना रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळते. युक्रेनमधून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून त्यामध्ये तिथल्या युद्धाची दाहकता लक्षात येते. दोन दिवसापुर्वी एका टॅक्सी चालक घरातून बाहेर पडला. त्याला बाहेर पडल्यानंतर आलेला अनुभव त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडला आहे. तो ज्यावेळी काही कारणास्तव बाहेर पडला त्यावेळी त्यांच्या समोरून त्यांच्यावरती बॉम्ब हल्ला सुरू झाला. त्यानंतर त्यांनी बॉम्ब हल्ल्यातून वाचत आपली टॅक्सी चालवल्याचे पाहायला मिळाले. अनेक देशांनी रशियांच्या विरोधात निदर्शने केली आहेत, तसेच रशियाच्या राष्ट्रपतींनी एखाद्या राष्ट्राने समजा आमच्यात भाग घेतला तर पुढच्या परिणामांना देखील सामोरे जा असं म्हणटलं आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती किती बिकट आहे याचा अंदाज अनेकांना आला असेल.
#Breaking: Russian Cruise Missile struck Kharkov police headquarter#RussianUkrainianWar pic.twitter.com/GdE9AxkJWK
— ICOF (@ICOF__) March 2, 2022
नागरिकांचे हाल
तिथं सतत बॉम्ब हल्ले होत असल्याने तिथले नागरिक दहशतीखाली आहेत, कारण केव्हाही कोणत्याही इमारतीवरती हल्ला होत असल्याने घरी असलेले नागरिक अत्यंत भयभीत झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.