रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तर चर्चेत आहेतच. पण त्यासोबत ते आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेत आलेत. वयाच्या 70 व्या वर्षी ते बाप होणार आहेत. त्यांच्या गर्लफ्रेन्डचं (Putin Girl Friend Pregnant) गूडन्यूज दिली. ही गुडन्यूज ऐकल्यानंतर खुद्द पुतिनही हैराण झाले. व्लादिमीर पुतिन हे 69 वर्षांचे आहेत. तर त्यांची गर्लफ्रेन्ड एलिना काबएवा ही 38 वर्षांची आहे. ऑलिंपिंक गोल्ड मेडलिस्ट असलेल्या एलिनासोबत (Alina Kabaeva) पुतिन 2008 पासून सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होते. पुतिन यांच्यापासून एलिनाला दोन मुलं असल्याचंही सांगितलं जातं. पण अजूनतरी पुतिन यांनी एलिनासोबतच्या आपल्या संबंधांबाबत कधीच अधिकृत खुलासा केलेला नाही. पण त्यांच्या संबंधांबाबत अनेक चर्चा रंगवल्या जातात. डेली मेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलिना पुन्हा एका गरोदर असल्याचं वृत्त समोर आलंय. हे कळल्यानंतर व्लादिमीर पुतिन हे देखील चक्रावून गेल्याचं बोललं जातंय.
रशियातील एका टीव्ही चॅनेलनेही एलिना पुन्हा गरोदर असल्याचं वृत्त दिलंय. जनरल एसवीआर टेलिग्रामने याबाबतचा दावा केलाय. हे न्यूज चॅनल क्रेमलिनचे माजी अधिकारी चालवतात, असं बोललं जातं. रशियातील राष्ट्रपती कार्यालयातील गुप्त अधिकाऱ्यांमार्फत हे चॅनेल चालवलं जात असल्याचंही सांगितलं जातं. गर्लफ्रेन्ड गरोदर असल्याचं कळल्यापासून पुतिन यांच्या वागण्यात, त्यांच्या देहबोलीत बदल जाणवला असल्याचं तिथल्या माध्यमांचं म्हणणंय. पुतिन हे उदास आणि नेहमीपेक्षा वेगळे दिसून आल्याचीही चर्चा सध्या रंगली आहे.
रशियातील या चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन आणि एलिना यांना पहिल्यांदा 2005 मध्ये मूल झालं होतं. स्वित्झर्लंडमध्ये एलिनानं एका बाळाला जन्म दिल्याचाही दावा या चॅनेलकडून करण्यात आलाय. मात्र एलिनाच्या पोटात सध्या असलेलं बाळ हे दुसऱ्याच कुणाचंतरी असल्याचाही संशय पुतिन यांना असल्याचीही कुजबूज सुरु झाली आहे. त्यामुळेच चे हैराण आणि उदास झाले असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, याच चॅनेलकडून पुतिन यांच्या प्रकृतीबाबतही एक वृत्त देण्यात आलं होतं. त्यानुसार पुतिन यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचा दावा करण्यात आलेला. यावरुनही संपूर्ण रशियात चर्चांना ऊत आलाय.
दरम्यान, 2019 मध्ये या दाम्पत्याच्या आयुष्यात दुसरा मुलगा आला होता. स्वित्झर्लंडमधील एका स्थानिक दैनिकानं याबाबतचा दावा केला होता. यानंतर एलिना एक खास हवाई यात्रा करुन परतली होती. गेल्या काही दिवसांत पुतिन यांच्यी गर्लफ्रेन्ड ही रशिया-युक्रेन यांच्यातील ताणलेल्या संबंधांवरुनही चर्चेत आलेली. दुसऱ्या महायुद्धात सोवियत युनियनने नाझिवादावर मिळलेल्या विजयाची तुलना एलिनानं पुतिन यांच्या युक्रेनवरहील हल्ल्यासोबत केली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं.