Russia Ukraine conflict : रशियाने युक्रेनवर युद्ध लादले आहे. पुतिन यांनी कीवविरुद्ध (Kyiv) युद्धाची घोषणा केली आहे. मॉस्कोनेही नाटो देशांना इशारा दिला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किवसह अनेक शहरांमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. यादरम्यान, एका युक्रेनियन महिलेने दावा केला, की रशियन सैनिक तिला टिंडर सोशल मीडिया साइटवर फ्लर्टी संदेश पाठवत आहेत. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) नावाच्या महिलेने सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक (Russian soldiers) तिला टिंडरवर (Tinder) मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. दशाचा दावा आहे, की अनेक रशियन सैनिक तिला सोशल मीडियावर फ्लर्ट करण्यासाठी कॉल करत आहेत. काही सैनिकांनी त्यांची छायाचित्रे पाठवून त्यांच्या पदाची आणि स्थितीची माहिती दिली आहे.
युक्रेनमधील अनेक महिलांच्या खात्यावर अशा संदेशांचा पूर येत असल्याचेही दशा म्हणते. असाच दावा करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे, की युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी रशियन सैनिकांनी डेटिंग अॅप्सवर त्यांची प्रोफाइल तयार केली आहे. 33 वर्षीय दशाच्या म्हणण्यानुसार, तिला एकट्याने टिंडरवर खाती तयार केलेल्या आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनहून अधिक रशियन सैनिकांकडून मेसेज मिळाले आहेत.
दशा सिनेलनिकोवा कीव (Kyiv) युक्रेन येथे राहते. ती म्हणते, की तिच्या मित्राने तिला टिंडरवर अनेक रशियन सैनिक आल्याची माहिती दिली, म्हणून सुरुवातीला तिने लक्ष दिले नाही. तिलाही असेच मेसेज येऊ लागले, तेव्हा या प्रकरणाची खोली लक्षात आली. आक्षेपार्ह मेसेजेसना कंटाळून दशाने तिची लोकेशन सेटिंग बदलून खार्कीव केली, त्यानंतर तर परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.
दशाच्या म्हणण्यानुसार, ‘एका फोटोमध्ये एक रशियन सैनिक घट्ट स्ट्रीप सँडोमध्ये होता. तर कुणीतरी पिस्तुल घेऊन बेडवर पोज देत होते. दशाने या मानसिकतेची खिल्ली उडवली आणि सांगितले, की मला त्यापैकी एकही आकर्षक वाटला नाही. वैऱ्यांसोबत बोलण्याचाही विचार मी करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया तिनं दिली.