मुंबई – रशियाने (russia) युक्रेनवरती (ukraine) किती भयानक पध्दतीने हल्ला केल्याचं आपण पाहतोय. रशियाने युक्रेनची राजधानी कीव (kiev) आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हल्ला केला आहे, कारण कीव ही युक्रेन देशाची राजधानी आहे. कीव मध्ये रशियाने बॉम्ब हल्ले करून आत्तापर्यंत अधिक नुकसान पोहचवलं आहे. अनेक लोकं तिथून देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. रशियाकडून होणा-या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचे प्राण गेल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे. नुकताच तिथला एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक टॅक्सीवाला बॉम्ब हल्ला वाचवत टॅक्सी चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. कीव मधील अनेक दृष्य देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अनेकांनी हे युद्ध थांबावं अस वाटतं असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात आलं आहे. तर तिथं शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त असलेले मायदेशी परतत असल्याचे पाहायला मिळतं आहेत.
युक्रेनमधील थरार
रशियाकडून वारंवार युक्रेनच्या लष्करी दलावरती हल्ला होत असल्याचे आपण पाहिले, तसेच कीव शहरातल्या सरकारी कार्यांवरती देखील जोरदार हल्ला केला आहे. खारकीव मध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. रशियातील अनेक लोकांनी रशियाच्या पुकारलेल्या युद्धाविरूध्द आंदोलन देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यांनी संपुर्ण शहर हादरून गेले आहे. तिथं रोज लोकांचे मृत्यू होत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक लढाऊ विमानं आकाशात भिडली असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘मार्शल लॉ’ म्हणजे काय
युक्रेनच्या राष्ट्रपतींनी युक्रेनमध्ये मार्शल लॉ जाहीर केला आहे, मार्शल लॉ म्हणजे तिथं फक्त लष्कर जे सांगेल ते ऐकावं लागतं. तिथं मार्शल लॉ जाहीर केल्याने लोकांनी बाहेर पुर्णपणे बंद केले आहे. रशियाला युक्रेनच्या सैन्याने देखील प्रत्युत्तर देत आहे. त्यामध्ये रशियाचे देखील अनेक जवान युद्धात मरण पावले आहेत. त्याचबरोबर लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर देखील पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने प्रतिकार होत असल्याने तिथं सध्या वास्तव करीत असलेले नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. एक टॅक्सी चालक तिथून जात असताना होत असलेला बॉम्ब हल्ला कसा चुकवत आहे हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.