PHOTO | सौदी अरेबियाने प्रसिद्ध केली पैगंबर यांच्या पावलाच्या ठशाची दुर्मिळ छायाचित्रे
या दगडाला हजरे असवद (Hajre Aswad) असेही म्हणतात. हे अरबी भाषेतील दोन शब्दांनी मिळून बनलेले आहे. अरबी भाषेत हजरचा अर्थ दगड असतो तर असवदचा अर्श सियाह (काळा) आहे. (Saudi Arabia publishes rare photographs of the Paigambar's footprints)
1 / 9
सौदी अरेबियाने मक्काच्या शाही मशिदीत उपस्थित मकाम-ए-इब्राहिमची काही अनोखी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदीना मामल्यांच्या जनरल प्रेसिडेन्सीने मकाम-ए-इब्राहिम मंजरला एका नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कॅप्चर केले आहे, ज्यामध्ये स्टॅक्ड पॅनोरमिक फोकसचा वापर केला आहे.
2 / 9
इस्लामच्या प्रथेनुसार मकाम-ए-इब्राहिम तो दगड आहे ज्याचा मक्कामधील काबाच्या बांधकामादरम्यान एक भिंत बांधण्यासाठी वापर करण्यात आला होता, जोणेकरुन त्यावर उभे राहून भिंत बांधू शकेल.
3 / 9
पैगंबरांच्या पायांचे ठसे जपण्यासाठी दगडाला सोने, चांदी आणि काचेच्या फ्रेमने सजविण्यात आले आहे. मुसलमानांचा असा विश्वास आहे की ज्या दगडावर पायांचा ठसा उमटलेला आहे तो दगड पवित्र काळा दगड हज-ए-असादसह थेट स्वर्गातून आला आहे.
4 / 9
द एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, मकाम-ए-इब्राहिम हा चौरस आकाराचा असून मध्यभागी पैगंबर इब्राहिमच्या पायांचे ठसे असलेले दोन अंडाकृती खड्डे आहेत. मकाम-ए-इब्राहिमचा रंग सफेद, काळा आणि पिवळा (सावली) दरम्यान आहे, तर त्याची रुंदी, लांबी आणि उंची 50 सेमी आहे.
5 / 9
मकाम-ए-इब्राहिम खान-ए-काबाच्या गेटच्या समोर स्थित आहे, जे पूर्वेला सफा आणि मारवाहच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 10-11 मीटर अंतरावर आहे.
6 / 9
काही दिवसांपूर्वीच 4 मे रोजी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी काबाच्या काळ्या दगडांचे असेच हाय-रिझोल्युशनवाले फोटो प्रसिद्ध केले होते. सौदी अरेबियाच्या सरकारने पाकिस्तानच्या मक्का शहरातील काबामधील काळ्या दगडाची आश्चर्यकारक छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.
7 / 9
या दगडाला हजरे असवद (Hajre Aswad) असेही म्हणतात. हे अरबी भाषेतील दोन शब्दांनी मिळून बनलेले आहे. अरबी भाषेत हजरचा अर्थ दगड असतो तर असवदचा अर्श सियाह (काळा) आहे.
8 / 9
शाही मशिदीकडून काढण्यात आलेली ही छायाचित्रे काढण्यास सुमारे 7 तास लागले आहेत. यावेळी 1000 हून अधिक चित्रे काढण्यात आली. सौदीच्या माहिती मंत्रालयाच्या सल्लागाराने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 49,000 मेगापिक्सेल पर्यंतचे फोटो काढण्यास 7 तास लागले.
9 / 9
अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, हा दगड काबाच्या पूर्वेकडील भागात आहे. हज किंवा उमराहच्या यात्रेवर जाणारे आजमीन काबाचा तवाफ (परिक्रमा) करतात आणि या दगडाचा बोसा (चुंबन) घेतात. चारही बाजूंनी चांदीच्या चौकटीत भरलेल्या या दगडाला फार महत्व असल्याचे बोलले जाते.