वॉशिंग्टन : मंगळग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी संशोधक अथक परिश्रम घेत आहेत. लवकरच याचा उलगडा होणार आहे. हजारो करोडो वर्षांपूर्वी मंगळावर विशाल महासागर होता असा दावा केला जात आहे. या संदर्भात संशोधकांना खळबळजनक पुरावे सापडले आहेत. मंगळ ग्रहाबाबत शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत मंगळावर संशोधन करणाऱ्या रोव्हरने मंगळावर पाणी असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. 350 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक विशाल महासागर होता. हा महासागर शेकडो हजार चौरस किलोमीटरपर्यंत पसरला होता. या दाव्याला संशोधकांनी दुजोरा दिला आहे.
मंगळ हा पूर्णपणे कोरडा ग्रह मानला जातो. इथे फक्त धुळीचे साम्राज्य आहे. 350 दशलक्ष वर्षांपूर्वी, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर विशाल महासागर अस्तित्वात होता. हा महासागर लाखो चौरस किलोमीटरमध्ये पसरला होता. या संदर्भातील पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत.
सॅटेलाईट इमेजमध्ये मंगळ ग्रहावर महासागर अस्तित्वात असल्याच्या खाणखुणा सापडल्या आहेत. नद्यांनी उंचावलेल्या 6,500 किमी पेक्षा जास्त प्रवाही पर्वतरांगा सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत. तसेच डेल्टा नदी प्रदेशात पाणबुडीचे पट्टे देखील सापडले आहेत.
महासागराच्या या खाणाखुणांवरुन एकेकाळी मंगळ ग्रहावर मुबलक पाणी होते असा दावा केला जात आहे. मात्र, या पाण्याचे काय झाले यावर देखील संशोधन सुरु आहे.
मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती यापूर्वी देखील समोर आली होती. यापूर्वी Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास करण्यात आला होता.
मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाच्या Curiosity रोवरनं महत्वाची माहिती मिळवली होती. मगंळ ग्रहावरील पृष्ठभागावर फिरणाऱ्या रोव्हरला तळाच्या भागात ओली माती दिसून आली आहे. त्याच्यावरील थरात वाळूची रचना आढळली होती.
आता या सॅटेलाईट इमेजमध्ये नदी, समुद्र तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या खामाखुणा स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे संशोधकांच्या प्रयत्नांना मोठं यश आले आहे.
Ancient Traces of a Giant Ocean Have Just Been Discovered on Mars https://t.co/m2rD4s3QtU
— ScienceAlert (@ScienceAlert) October 31, 2022