सेक्स, ईश्वर आणि बंदूका, अमेरिकेतल्या त्या हत्याकांडाचं कोडं उलगडलं? वाचा काय म्हणतो हत्यारा?

| Updated on: Mar 19, 2021 | 12:58 PM

अमेरिकेत गोळीबार ही काही नवीन घटना नाही पण या हत्याकांडाचं जे कारण समोर येत आहे ते मात्र विचार करायला लावणारं आहे. (Sex, God and Guns, Asians attacked in America)

सेक्स, ईश्वर आणि बंदूका, अमेरिकेतल्या त्या हत्याकांडाचं कोडं उलगडलं? वाचा काय म्हणतो हत्यारा?
Asians attacked in America
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेत गेल्या मंगळवारी अटलांटा शहरात गोळीबार झाला. ह्या हत्याकांडात 8 जणांचा बळी गेला. त्या सर्व महिला आशियाई वंशाचे होत्या. अमेरिकेत गोळीबार ही काही नवीन घटना नाही पण या हत्याकांडाचं जे कारण समोर येत आहे ते मात्र विचार करायला लावणारं आहे. (Sex, God and Guns, Asians attacked in America)

नेमकी काय घटना घडली होती?

जॉर्जिया राज्यात मंगळवारी रात्री एकानं गोळीबार केला. अटलांटात काही ठिकाणी आशियाई महिला स्पा चालवतात. अशाच एका गोल्डन नावाच्या स्पामध्ये हा गोळीबार केला गेला. त्यानंतर यंग्ज एशियन नावाच्या पार्लरवरही हल्ला झाला.  त्यात 8 महिला मारल्या गेल्या. सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला असावा किंवा वर्णद्वेषातून हा हल्ला झाला असावा असा कयास बांधला गेला. रॉबर्ट एरॉन लॉन्ग नावाच्या माथेफिरुला ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे आरोपीनं गोळीबारानंतर पळून जाण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही. पोलीसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढच नाही तर आरोपी हा सेक्स अॅडीक्ट असून त्याच व्यसनातून त्यानं हा गोळीबार केल्याचं तपासात उघड झालं आहे.

Asians attacked in America 1

सेक्स, ईश्वर आणि बंदूका

आरोपी रॉबर्ट एरॉन लॉन्गनं जे सांगितलं त्यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते. वर्षद्वेषातून हा हल्ला झाला असावा असा अंदाजावर पोलीस जास्त भर देत होते. त्यांनी रॉबर्टची आणखी चौकशी केली तर तो बोलता झाला. काही मसाज पार्लरमध्ये देहव्यापार चालतो. अशा काही ठिकाणी रॉबर्टनं गेल्याचं सांगितलं. चौकशीत तो म्हणाला की, अशी ठिकाणं मला आवडतात. मला ईश्वर आणि बंदूकाही आवडतात. मसाज पार्लरसारखी ठिकाणं आवडतात म्हणून ती नष्ट करायची आहेत असाही तो पोलीस चौकशीत बोलला. त्याच उद्देशानं त्यानं मंगळवारी गोळीबार केला आणि त्यात 8 महिलांना जीवाला मुकावं लागलं.

आशियाई वंशाच्या लोकांमध्ये भीती

आरोपी रॉबर्ट लॉन्गने जरी हल्ल्याचं कारण सेक्सचं व्यसन दिलं असलं तरी आशियाई वंशाच्या लोकांना हा हल्ला वर्षद्वेषातून झाल्याचं वाटतं. त्यासाठीच हल्ल्याचा निषेध म्हणून वाशिंग्टनमध्ये कँडल मार्च काढला गेला. अशा हल्ल्यांच्याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आल्याचं आशियाई लोकांना वाटतं. वॉशिंग्टनमधल्या चायनाटाऊनमध्ये विशेषत: ह्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. आशियाई महिला अमेरिकेत कुठेच सुरक्षित नाहीत असाही काही महिला दावा करत आहेत.  (Sex, God and Guns, Asians attacked in America)

संबंधित बातम्या : 

हुकुमशाह किमच्या बहिणीचा थेट अमेरिकाला इशारा, ‘4 वर्षे शांतपणे झोपायचं असेल, तर स्फोटकांच्या दुर्गंधीपासून दूर राहा’

पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?