जगात काही देशांना स्वत:चा एअरपोर्टच नाही, मग कसा करतात ते प्रवास

| Updated on: Feb 24, 2023 | 9:43 AM

जगात विमानप्रवासाच्या महत्व किती आहे, हे नव्याने सांगायला नको, परंतू जगात काही असेही देश आहेत जिथे विमानतळच नाही.

जगात काही देशांना स्वत:चा एअरपोर्टच नाही, मग कसा करतात ते प्रवास
AIR PORT
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : जलद वाहतूकीच्या साधनांनी जग एकमेकांच्या जवळ येत आहे. जगाला आता ग्लोबल व्हीलेज मानले जात आहे. भारतासह जगभरात जलद वाहतूक सुरू केली जात आहे. जलद वाहतूकीसाठी विमान वाहतूकीला जगात पर्यायच नाही. असे असताना जगात काही असेही देश आहेत की त्यांच्या जवळ स्वत:चे विमानतळच नाही, मग हे लाेक बिचारे विमान प्रवास कसा करतात हे तुम्हाला माहीती आहे का ? चला करू या देशांची सफर…

जलद वाहतूकीसाठी रेल्वे, सेमी फास्ट ट्रेन, बुलेट ट्रेन आणि पुढे जाऊन हायपर लूप सारख्या मार्गांचा शोध लावला जात आहे. परंतू जगात आजही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी आजही विमानसेवेला पर्याय नाही. परंतू जगात असेही काही देश आहेत, ज्यांच्याकडे स्वत:चा विमानतळ नाही. मग ते देश काय करतात.. तर ते विमान पकडायला दुसऱ्या देशात जात असतात. जगात आजही चार देश आहे, ज्यांच्याकडे स्वत:चा विमानतळ नाही. मग या देशातील लोक रस्ते किंवा जलमार्गाने शेजारच्या देशात जाऊन विमान पकडतात. चला पाहूया कोणते असे देश आहेत जिथे ही समस्या आहे.

लिंकेस्टाईन –

लिंकेस्टाईन या युरोपातील छोट्या देशाकडे स्वत: चा विमानतळ नाही, हा देश सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे. अवघ्या 75 किमी भागाचा हा देश आहे. या देशातून जर आपल्याला कुठे विमानाने जायचे असेल तर ज्युरीच विमानतळावर जाऊन विमान पकडावे लागते.

वेटिकन सिटी –

वेटिकन हा देश ख्रिश्चन लोकांसाठी पवित्र देश मानला जातो. इटलीची राजधानी रोममध्ये जवळपास 109 एकरवर हा देश वसला आहे. या छोट्या देशाकडे एकही विमानतळ नाही. या देशातले लोक रोमच्या विमानतळाचा विमान प्रवासासाठी वापर करीत असतात.

सॅन मारिनो –

सॅन मारिनो हा जगातील एक छोटा देश आहे. याच्याकडे देखील स्वत: चा विमानतळ नाही. या देशात जाण्यासाठी किंवा तेथून विमानाने दुसरीकडे जाण्यासाठी शेजारील इटली देशातील रिमिनी विमान तळावर पोहचावे लागते.

मोनाको –

मोनाको हा युरोपातील एक छोटासा देश आहे, हा देश तिन्ही बाजूंनी फ्रान्सने घेरलेला आहे. या देशालाही स्वत: चा विमानतळ नाही. तेथे विमानाने जाण्यासाठी फ्रान्सच्या नाइस कोटे विमानतळावर उतरावे लागते. त्यानंतर रस्ते किंवा जलमार्गाचा वापर करावा लागत असतो.