जोहान्सबर्ग: जोहान्सबर्गमधील बारमध्ये अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात 14 लोकांचा मृत्यू (14 people killed in the shooting) झाला आहे. ही घटना जोहान्सबर्गमधील सोवेटो टाऊनशिपमध्ये (Soweto Township in Johannesburg) ही घटना घडली आहे. रविवारी झालेल्या घटनेची माहिती देताना पोलीस लेफ्टनंट इलियास मावेला यांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला असल्याचा आम्हाला रात्री साडेबारा वाजता फोन आला होता. त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यावेळी केलेल्या गोळीबारात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामधील जखमी (Injured) झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी उपचारादम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढून 14 वर पोहोचला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्या बारमध्ये गोळीबार करण्यात आहे, तो बार राजधानीच्या आग्नेयेला असलेल्या जोहान्सबर्गच्या सर्वात मोठ्या टाउनशिपमध्ये सोवेटोच्या ओरनाल्डो जिल्ह्यात आहे. माध्यमांनी सांगितलेल्या वृत्तानुसार गोळीबार झाल्याचे वृत्त पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करून जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.
अजूनही या प्रकरणातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एका व्यक्तीला जखमी अवस्थेत ख्रिस हानी बरगावनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका गटाकडून हा गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांची संख्याही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गोळीबार झालेल्या ठिकाणी 12 जणांचे मृतदेह पडले होते, पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले मात्र हा गोळीबार का केला गेला आहे. त्याची माहिती अजून पोलिसांनी मिळाली नाही. गोळीबारात ठार झालेले लोक एकत्र येऊन मौजमजा करत होते, मात्र त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला आहे अजून स्पष्ट झाले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.